
मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, दिसून येईल बदल
शाळेत जाणारी मुले मोठी होत असताना त्यांच्या आयुष्यात संगत आणि बाहेरील वातावरणाचा प्रभाव वाढू लागतो. या वयात मुले सहज प्रभावित होतात. जर ती चुकीच्या किंवा वाईट संगतीत गेली तर त्याचा परिणाम त्यांच्या वागणुकीत, सवयींमध्ये आणि अभ्यासात हळूहळू दिसू लागतो. अनेकदा हे बदल अचानक न होता सूक्ष्म स्वरुपात होतात, त्यामुळे पालकांनी जागरुक राहणे अत्यंत गरजेचे असते.(फोटो सौजन्य – istock)
वाईट संगतीत असलेली मुले आधीपेक्षा जास्त चिडचिडी, उद्धट किंवा आक्रमक वागू लागतात. आई-वडिलांचे ऐकणे बंद करतात. उत्तर देताना बोलण्यात तिरसटपणा दिसतो किंवा सतत विरोध करण्याची सवय लागते. पूर्वी शांत आणि बोलकी असलेली मुले अचानक अबोल होतात किंवा फारच गुप्तपणे वागू लागतात. त्यांच्या वागण्यात खोटे बोलणे, कारण नसताना घराबाहेर जाण्याची घाई किंवा वेळेबाबत बेफिकिरी दिसू लागते.
अभ्यासातही बदल स्पष्ट जाणवतात. अभ्यासात लक्ष न लागणे, गुण अचानक कमी होणे, गृहपाठ टाळणे किंवा शाळेबद्दल नकारात्मक बोलणे ही लक्षणे दिसू शकतात. शाळेत जाण्याची इच्छा होत नाही. वारंवार आजाराचे कारण देणे किंवा शिक्षकांविषयी तक्रारी करत राहणे हेही बदलाचे संकेत असू शकतात. काही मुले त्यांच्या जुन्या चांगल्या मित्रांपासून दूर जाऊन नवीन मित्रांमध्येच अधिक वेळ घालवू लागतात. सवयींमध्ये होणारे बदल पालकांनी विशेष लक्षात घ्यावेत. झोपेच्या वेळा बदलणे, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, मोबाइल किंवा इंटरनेटचा अतिवापर, घरच्यांपासून लपून फोनवर बोलणे किंवा मेसेजेस डिलीट करणे ही लक्षणे दिसू शकतात.
तुम्हालाही Breast cancer तर नाही? कपडे घालताना ही गोष्ट नक्की तपासा, वेळीच टाळता येईल गंभीर समस्या
पालकांनी हे बदल ओळखण्यासाठी मुलांशी सतत संवाद ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांशी बोलताना चौकशीच्या स्वरात नव्हे तर विश्वासाने, समजून घेण्याच्या भूमिकेतून बोलावे. त्यांच्या मित्रांविषयी, शाळेतील घडामोडींविषयी आणि आवडी-निवडींबद्दल नियमितपणे चर्चा केल्यास अनेक गोष्टी सहज लक्षात येतात. मुलांच्या वागण्यात अचानक झालेले बदल दुर्लक्षित न करता शांतपणे त्यामागचे कारण ऐकून घ्यावे.