
Breast Milk Jaundice: आईच्या दुधामुळे नवजात बाळाला कावीळ का होते? जाणून घ्या मुख्य कारण
माहितीनुसार, ब्रेस्ट मिल्क जॉन्डिस हा सहसा गर्भधारणेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होतो. याकाळात जर बाळाला पुरेसे दूध मिळाले नाही तर त्याच्या आकड्यांमध्ये बिलीरुबिनचे शोषण वाढते, कारण यकृत पूर्णपण विकसित झालेले नसते. यामुळेच त्वचा अचानक पिवळी पडू लागते. चला यावर कोणता आणि कसा उपचार करता येईल ते जाणून घेऊया.
समस्येवर उपचार काय?
डाॅक्टरांच्या मते, बहुतेक प्रकरणांमध्ये ब्रेस्ट मिल्क जॉन्डिसमध्ये बिलीरुबिनची पातळी आणि त्याचे निरीक्षण केले जाते. याहून वेगळी कोणतीही गोष्ट किंवा उपचार करण्याची गरज नसते.
आईचे दूध बंद करावे का?
ब्रेस्ट मिल्क जॉन्डिस रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. ही समस्या ओढावल्यास कावीळचे नीट निरीक्षण करुन त्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. आता अनेकांना वाटत असेल की, ब्रेस्ट मिल्क जॉन्डिसमध्ये बाळाला आईचे दूध देणे थांबवायला हवे. परंतु हे चुकीचे आहे, डाॅक्टर आईचे दूध थांबवण्याची शिफारस देत नाहीत. कारण या दूधात अनेक पौष्टीक घटक असतात जे बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी फायद्याचे ठरु शकतात. बिलीरुबिनच्या पातळीत तीव्र वाढ झाल्यासच स्तनपान तात्पुरते थांबवले जाऊ शकते पण तेही कठोर वैद्यकीय देखरेखीखाली.
उपचार कसा करावा?
नवजात मुलांमध्ये कावीळ झाल्यास फोटोथेरपी हा सर्वात सामन्य उपचार मानला जातो. याच्या मदतीने बाळाच्या शरीरातील बिलीरुबिनला अशा स्वरूपात रूपांतरित करते जे मूत्र आणि मलमार्गे ते बाहेर टाकले जाईल. गंभीर कावीळ असलेल्या बाळांना एक्सचेंज ट्रान्सफ्यूजनची आवश्यकता असू शकते, जरी हे दुर्मिळ आहे. याव्यतिरिक्त काहींची समस्या गंभीर असल्यास त्यांना पुढील तपासणी आणि उपचारांची गरज भासू शकते, ज्यात औषधे, अँटीव्हायरल, फेनोबार्बिटोन किंवा स्टिरॉइड्स किंवा शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.