
कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतो हर्नियाचा त्रास! शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे आणि त्यावरील उपाय
हर्निया होण्याची कारणे?
पोटाचे आजार कशामुळे होतात?
हर्निया पुरुषांमध्ये का दिसून येतो?
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण कालांतराने आजाराची लक्षणे वाढतात आणि शरीराला हानी पोहचते. त्यातील प्रामुख्याने आढळून येणारा आजार म्हणजे हर्निया. हर्नियाच्या वेदना फार तीव्र आणि असह्य असतात. हर्निया झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने लक्षणे अतिशय तीव्र होतात आणि शरीरात बदल दिसून येतात. पोटातील स्नायू कमकुवत झाल्यानंतर हर्निया होण्याची जास्त शक्यता असते. आतडी किंवा फॅटी टिश्यू कमकुवत होतात आणि बाहेर फुगू लागतात, त्यावेळी हर्निया होण्याची जास्त शक्यता असते. उभं राहिल्यानंतर, खोकताना जड वजन उचलताना पोट, नाभी किंवा मांडीजवळ हलका त्रास जाणवत असेल तर ही सामान्य लक्षणे आहेत. पण पोटात जडपणा, ताण जाणवणे, जास्त वेळ उभं राहिल्यावर अस्वस्थता, गॅस होणे, बद्धकोष्ठता किंवा वारंवार पोट फुगणे इत्यादी लक्षणे वाढू लागल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. चला तर जाणून घेऊया हर्नियाची लक्षणे आणि उपाय.(फोटो सौजन्य – istock)
हर्नियापासून बचाव करण्यासाठी मलाशयाची योग्य प्रकारे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय वजन वाढू न देणे, लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे, प्रोटीन आणि व्हिटामिन सी सप्लीमेंटचं सेवन करा, आरामदायक अंडरगारमेंट्सचा वापर करा, पोटाच्या स्नायूंवर अधिक दबाव टाकणारी कामे इत्यादी गोष्टी केल्यास हर्निया होणार नाही. हर्निया झाल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. याशिवाय पोटासंबंधित कोणत्याही आजाराची लागण झाल्यास ताजे आणि सहज पचन होणारे पदार्थ खावेत.
Ans: ओटीपोट, मांडी किंवा नाभीच्या भागात दिसणारी गाठ, जी उभे राहताना किंवा खोकताना वाढते आणि झोपल्यावर कमी होते.
Ans: इनग्विनल, फेमोरल, अम्बिलिकल, इन्सिजनल
Ans: नाही, बाळांमधील नाभीसंबंधी हर्निया वगळता, प्रौढांमधील हर्निया स्वतःहून बरा होत नाही; त्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असते [७].