
'Minimization' म्हणजे काय? घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी 'या' गोष्टी ठरतील उपयोगी
आज काय घालू?’ पासून ते ‘घरात एवढा पसारा कुठून आला?’ इथपर्यंत आपण स्त्रिया दररोज अनेक विचारांशी झगडत असतो. ‘मिनिमलायझेशन’ म्हणजे सर्व सुखाचा त्याग करणे नव्हे, तर ज्या गोष्टी आपल्याला खरोखर आनंद देतात, त्याच गोष्टीसोबत जगणे, एक एक करत जमवलेल्या वस्तू जेव्हा पसारा वाटू लागतात, तीच वेळ असते मिनिमलायझेशनची ! अर्थात कमी करण्याची. फेकून देणे हा त्यावर उपाय नाही. तर आपल्या दृष्टीने निरुपयोगी झालेली वस्तू वापरण्याजोग्या स्थितीत असताना देऊन टाकणे हा योग्य पर्याय आहे.(फोटो सौजन्य – istock)
आपल्यापैकी अनेकींच्या कपाटात असे कपडे असतात जे आपण ‘कधीतरी बारीक झाल्यावर घालू’ म्हणून साठवून ठेवतो. मिनिमलायझेशनचा पहिला नियम म्हणजे जे कपडे गेल्या १ वर्षात तुम्ही एकदाही घातले नाहीत, ते कोणालातरी देऊन टाका. कपाटात मोजके पण उत्तम कपडे असतील, तर दररोज सकाळी काय घालू हा निर्णय घेण्याचा ताण कमी होतो.
खरेदीच्या उत्साहात आपण अनेकदा अशी उपकरणे किंवा भांडी घेतो ज्याचा वापर वर्षातून एकदाच होतो. ओट्यावर जेवढा कमी पसारा, तेवढी कामात गती आणि मनात शांतता राहते. ‘मल्टी-पर्पज’ गोष्टींचा वापर वाढवणे हाच खरा मिनिमलिझम आहे.
केवळ वस्तूच नाही, तर विचारही मिनिमल करा. सोशल मीडियावरील नको असलेल्या लोकांशी तुलना करणे, सतत ‘परफेक्ट’ दिसण्याचा दबाव घेणे हे मानसिक पसारे आहेत. जे लोक किंवा जे विचार तुम्हाला ऊर्जा देत नाहीत, त्यांना आयुष्यातून ‘डिलीट’ करायला शिका.
सर्वांसाठी जगताना स्वतःला विसरू नका; हे 5 प्रसंग जिथे ‘सेल्फिश’ होणंच योग्य ठरतं
डेकोर दहा स्वस्त गोष्टी घेण्यापेक्षा एकच पण उत्तम दर्जाची वस्तू घेण्याची सवय लावा. यामुळे घराचा पसारा कमी होतो आणि पैशांचीही बचत होते. मिनिमलिस्ट स्त्री ही अधिक सजग ग्राहक असते. जेव्हा वस्तू कमी असतात, तेव्हा त्या आवरण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत वाचते.