
वडिलांनी मुलांशी कोणत्या गोष्टी बोलणं टाळावं (फोटो सौजन्य - iStock)
किशोरावस्था हा मुलांसाठी आणि पालकांसाठी खूप नाजूक काळ आहे. विशेषतः जेव्हा १३ वर्षांच्या मुलीचा विचार केला जातो तेव्हा वडील-मुलीच्या नात्याचे संतुलन साधणे थोडे आव्हानात्मक बनते. वडिलांना अनेकदा वाटते की ते प्रेमाने मुलीशी सर्व विषयांवर बोलू शकतात, परंतु त्यांना हे माहीत असणे आवश्यक आहे की आजकाल त्यांच्या किशोरवयीन मुलींसोबत काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. असे केल्याने मुलगी आणि वडील यांच्यातील अंतर कमी होईल आणि बंध नेहमीच मजबूत होईल.
तुझी मासिक पाळी चालू आहे का?
जेव्हा मुलगी चिडचिडी किंवा रागावलेली असते, तेव्हा ते थेट तिच्या मासिक पाळीशी जोडले जाऊ नये याची खात्री वडिलांनी करून घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत, वडिलांनी कधीही आपल्या मुलीला असे प्रश्न विचारू नयेत. यामुळे तिला असे वाटू लागते की तिच्या भावना या अतिशयोक्ती असणाऱ्या आहेत. आधी तिच्या आईशी याबाबत बोलावे आणि नंतर हे सर्व सामान्य आहे अशाच जाणीवेने तिच्याशी वडिलांनी वागावे. ज्यामुळे दोघांमध्येही कोणताही आंतरिक दुरावा येणार नाही.
तुझे कोणाशी अफेअर आहे का?
तुमच्या किशोरवयीन मुलीला थेट प्रश्न विचारणे किंवा सतत नात्याबद्दल प्रश्न विचारणे तिला दूर करू शकते. किशोरवयीन मुले त्यांच्या मैत्रीबद्दल खूप प्रोटक्टिव्ह असतात. जास्त दबावामुळे ती तुमच्यापासून गोष्टी लपवेल असे कोणतेही प्रश्न तिला विचारू नका. तिच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तिने काहीही चुकीचे करू नये हे प्रत्येक वडिलांना वाटते. मात्र असे अचानक तिला विचारणे तिच्यासाठी धक्कादायक ठरू शकते.
बोलता बोलता सहजपणाने तिला त्रास होणार नाही अथवा तिला धक्का बसणार नाही अशा पद्धतीनेच ही माहिती काढून घ्या. तिला काहीही यात वावगं वाटणार नाही याची काळजी आई आणि वडील दोघांनीही घ्यायला हवी, विशेषतः वडिलांनी. वडिलांचा एक प्रकारे धाक असल्यामुळे मुली बिथरू शकतात.
इतके तोकडे कपडे का घातले आहेत?
मुलींना तिच्या कपड्यांबद्दल वारंवार तिला अडवल्याने तिचा स्वाभिमान दुखावू शकतो. जर तुम्हाला तिच्या ड्रेसिंगवर आक्षेप असेल तर टीका करण्याऐवजी ती सूचना म्हणून त्यांच्याशी बोला, अथवा असे कपडे घालण्याचा काय तोटा असू शकतो हे मुलींना समजावून सांगा. इतकंच नाही तर अशा कपड्यांमुळे काय घडू शकते आणि त्याचा शारीरिक कसा परिणाम होऊ शकतो हेदेखील तिला समजावा.
Parenting Tips: लहानमुलांसमोर कधीच करू नका या चुका! स्वतः सायकॉलॉजिस्ट सांगतात…
तू सतत तुझ्या फोनवर काय करत असतेस?
हा प्रश्न तिच्या गोपनीयतेवर आक्रमण केल्यासारखा तिला वाटू शकतो. आजच्या डिजिटल युगात, फोन हे तिचे सामाजिक जीवन आहे. तिच्यावर हेरगिरी करण्याऐवजी, तिच्याशी असे नाते निर्माण करा जेणेकरून ती तुम्हाला तिच्या सर्व मित्रमैत्रिणींबाबात आणि सोशल मीडियावरही ती काय करत आहे याबाबत स्वतःहून येऊन तुम्हाला सांगेल. त्यामुळे वडील म्हणून तुम्ही तिच्यावर कोणतीही जबरदस्ती न करता जबाबदारीने वागा आणि तिच्याशी मैत्रित्वपूर्ण नात्याने वागा.