Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral तापानंतर पालकांनी घ्यावी मुलांची विशेष काळजी, लवकर बरे होण्यासाठी सोपे उपाय

व्हायरल ताप येणे हे सामान्य आहे. मात्र लहान मुलांना यातून बरं होण्यास वेळ लागतो. संसर्गाशी लढण्यासाठी लहान मुलांनी कशी प्रतिकारशक्ती वाढवावी याबाबत अधिक माहिती या लेखातून आम्ही देत आहोत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 31, 2025 | 04:32 PM
लहान मुलांचा ताप आल्यावर कसं रिकव्हर होणार (फोटो सौजन्य - iStock)

लहान मुलांचा ताप आल्यावर कसं रिकव्हर होणार (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हायरल ताप आल्यावर काय काळजी घ्यावी 
  • लहान मुलांनी कशी प्रतिकारशक्ती कशी वाढवावी
  • पालकांसाठी तज्ज्ञांनी दिल्या टिप्स 

व्हायरल फिव्हर नंतर मुलांना अशक्तपणा येणे ही एक सामान्य बाब आहे. संसर्गाशी लढण्यासाठी मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीला प्रौढांच्या तुलनेने अधिक खूप मेहनत घ्यावी लागते. यामुळे मुलांना काही दिवस शारीरिक ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटू लागते.  विषाणूजन्य आजारानंतर अशक्तपणा येणे नैसर्गिक आहे, परंतु मुलांची योग्य काळजी घेतल्यास त्यांना लवकर बरे होण्यास मदत होते.

भारतात अनेक मुलं ही  विषाणूजन्य(व्हायरल) संसर्गातून बरे होत आहेत आणि त्यांना तीव्र ताप, खोकला, सर्दी, घसा खवखवणे, अंगदुखी आणि थकवा येणे यासारखी लक्षणे दिसून येतात. या टप्प्यात, पालकांनी भूमिका महत्त्वाची ठरते. अशावेळी काय करावे आणि काय करू नये याबाबत विशेष माहिती तज्ज्ञांनी या लेखाच्या माध्यमातून दिली आहे. डॉ. प्रशांत लक्ष्मणराव रामटेककर, बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी खास टिप्स दिल्या आहेत. 

काय कराल?

पुरेसा विश्रांती आणि झोप घ्या: विश्रांती ही शरीराला स्वतःला बरे करण्याची संधी देते. विषाणूजन्य तापातून बरे होणाऱ्या मुलांना दररोज रात्री त्यांच्या वयानुसार झोपेची आवश्यकता भासते. प्रीस्कूलर (३ ते५ वर्षे): १० ते १३ तास , प्राथमिक शाळेतील मुलं (६-१२ वर्षे): ९ ते १२ तास, किशोरवयीन मुले (१३ ते १८ वर्षे): ८-१० तास. शिवाय, अधूनमधून विश्रांती घेतल्यास मुलांना ताजेतजावे वाटते. मुलाला बरे वाटेपर्यंत शाळेत किंवा शिकवणीला पाठवू नका.

ताप आल्यानंतर लहान मुलांना स्पंजिंग कसे करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

मुलांना हायड्रेटेड ठेवा 

तापामुळे घाम येणे किंवा द्रवपदार्थांचे सेवन कमी झाल्याने डिहायड्रेशनची समस्या सतावते. मुलांनी दिवसभर नियमितपणे पाणी, सूप, नारळ पाणी, ताक किंवा लिंबाचा रस प्यावा. ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज सुमारे ५ कप (१.२ लिटर)तर ,९ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज ७ ते ८ कप (१.६-१.९ लिटर), किशोरवयीन मुलांनी(१४-१८ वर्षे)दररोज ८ ते ११ कप (१.९-२.६ लिटर) पाणी प्यावे.जर मुल पुरेसे पाणी पित नसेल तर त्यांना डिहायड्रेशनची समस्या सतावू शकते म्हणून हायड्रेशन अतिशय गरजेचे आहे. 

संतुलित, पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित करा

पालकांनी आपल्यांना मुलांना हलके, घरी शिजवलेले, ताजे अन्न द्यावे . जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स कमतरता भरुन काढण्यासाठी फळे, भाज्या, प्रथिनयुक्त आहार, अंडी, दही, प्रोबायोटिक्स आणि रोगप्रतिकारक शक्ती पुनर्संचयित करण्यासाठी तृणधान्य आणि सूपचा आहारात समावेश करा. 

लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका 

१० ते १४ दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारा थकवा किंवा चक्कर येणे, हृदयाचे वाढलेले ठोके किंवा दम लागणे यासारखी लक्षणं दिसताच त्वरित तपासणी करा. हे मायोकार्डिटिस किंवा अशक्तपणा सारख्या विषाणूजन्य गुंतागुंती दर्शवितात.

पाऊस ओसरताच आजारांचा फैलाव; ‘या’ तालुक्यात ताप, डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

या गोष्टी टाळाच

मूल पूर्णपणे बरे होईपर्यंत शारीरिक श्रम करणे, खेळणे किंवा शाळेत पाठविणे टाळा. जास्त श्रम केल्याने थकवा येतो आणि बरे होण्यास आणखी वेळ लागतो. मुलांना जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ देणे टाळा. तळलेले, शर्करायुक्त किंवा प्रक्रिया केलेले अन्न पचनक्रिया मंदावतात आणि बरे होण्याचा कालावधी वाढतो. त्याऐवजी, सौम्य, पौष्टिक आणि घरी तयार केलेल्या अन्नाचे सेवन करा.

मुलांना कॅफिन युक्त द्रव आणि एनर्जी ड्रिंक्स देणे टाळा: कॅफिनमुळे झोपेचा त्रास होऊ शकतो आणि मुलांमध्ये डिहायड्रेशन होऊ शकते. पूर्णपणे बरे होईपर्यंत चहा, कॉफी, कोल्ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंक्स पूर्णपणे टाळा.

मुलं पुरेशी विश्रांती आणि झोप घेतील याची खात्री करा, संतुलित आहारासह योग्य हायड्रेशन गरजेचे आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांसह पौष्टिक आहार तितकाच महत्वाचा आहे. जंक फूड, कॅफिनयुक्त द्रव आणि अतिश्रम करणे टाळा. योग्य काळजी घेतल्यास, बहुतेक मुलं ताप कमी झाल्यानंतर एक किंवा दोन आठवड्यांत पूर्ववत उर्जा प्राप्त करतात.

Web Title: Parents should take special care of their children after viral fever simple solutions for quick recovery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • Health Tips
  • viral

संबंधित बातम्या

आतड्यांमध्ये साचलेला मल बाहेर कसा काढायचा? सद्गुरूंनी सांगितले 3 प्रभावी उपाय; या घरगुती पदार्थांचा करावा लागेल वापर
1

आतड्यांमध्ये साचलेला मल बाहेर कसा काढायचा? सद्गुरूंनी सांगितले 3 प्रभावी उपाय; या घरगुती पदार्थांचा करावा लागेल वापर

Brain Stroke: वेळीच स्ट्रोकची लक्षणे ओळखल्यास वाचू शकतो अमूल्य जीव, तज्ज्ञांचा खुलासा
2

Brain Stroke: वेळीच स्ट्रोकची लक्षणे ओळखल्यास वाचू शकतो अमूल्य जीव, तज्ज्ञांचा खुलासा

World Brain Stroke Day: ‘या’ 5 गोष्टी तुम्हाला ब्रेन स्ट्रोकपासून वाचवतील,  तज्ज्ञांकडून दिलासा
3

World Brain Stroke Day: ‘या’ 5 गोष्टी तुम्हाला ब्रेन स्ट्रोकपासून वाचवतील, तज्ज्ञांकडून दिलासा

Couple Weight Gain: लग्नानंतर का वाढते नवरा-बायकोचे वजन, शरीरसंबंध की अजून काही कारण? जाणून घ्या तथ्य
4

Couple Weight Gain: लग्नानंतर का वाढते नवरा-बायकोचे वजन, शरीरसंबंध की अजून काही कारण? जाणून घ्या तथ्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.