बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा इतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. लहान मुलं आजार पडल्यानंतर त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. खोकला, सर्दी किंवा ताप आल्यानंतर विषाणूजन्य संसर्गाला आपण सहज बळी पडतो. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलं आजारी पडल्यानंतर त्यांच्या आहारात आरोग्यासाठी पौष्टिक असलेले पदार्थ त्यांना खाण्यासाठी द्यावे.
हवामानात थोडा जरी बदल झाला तरीसुद्धा लहान मुलं लगेच आजारी पडतात. पण काहीवेळेस हा ताप औषध देऊनसुद्धा कमी होत नाही. अशावेळी अनेक पालक आपल्या मुलांना थंड पाण्याने पुसून काढतात. तसेच त्यांच्या डोक्यावर मीठाच्या पाण्याच्या घड्या ठेवतात. यामुळे ताप हळूहळू कमी होतो. पण अनेक पालकांना प्रश्न पडतो की लहान मुलांचे अंग ओल्या कापडाने पुसावे की नाही? त्यावर गुडविल चिल्ड्रन क्लिनिकचे बालरोगतज्ञ डॉ. सय्यद मुजाहिद हुसेन यांनी काही सल्ला दिला आहे. चला तर जाणून घेऊया डॉक्टरांनी दिलेला महत्वपूर्ण सल्ला.
ताप आल्यानंतर लहान मुलांना स्पंजिंग कसे करावे?
बालरोगतज्ञ डॉ.सय्यद मुजाहिद हुसेन यांच्या सांगण्यानुसार, लहान मुलांना ताप आल्यानंतर पॅरासिटामॉलसारखी औषधे देऊन २४ तासांच्या आतमध्ये ताप उतरला नाही, तर पालकांनी मुलांचे अंग ओल्या कापडाने पुसून काढावे. मुलांच्या मूत्रपिंड आणि यकृताचे औषधांमुळे होणारे नुकसान होण्यापासून संरक्षण लहान मुलांना ४ तासांच्या अंतराने औषध द्यावी. तसेच लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी बाळाचे तापमान 102 ते 104 असताना सुती कापडाने बाळाचे कपाळ, खांदे, मान आणि छाती हळूवारपणे पुसून काढा. यामुळे ताप कमी होईल.
[read_also content=”काळ्या द्राक्षांपासून घरी बनवून पाहा अंगूर बर्फी, सोपी रेसिपी https://www.navarashtra.com/lifestyle/try-homemade-grapes-barfi-made-from-black-grapes-539092.html”]
पण लहान मुलांना औषध दिल्यानंतर सुद्धा ताप येत असेल तर थंड पाण्याने स्पंजिंग करावे. जर स्पंजिंग करताना मुलं थरथर कापू लागले तर त्याला उबदार कपड्यात गुंडाळावे. यामुळे मुलांना थंडी वाजणार नाही. ताप आल्यानंतर लहान मुलं अशक्त होऊन जात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन वेळेत औषध उपचार करावे. ताप जास्त वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधांमध्ये बदल करावा.
मुलांना ताप आल्यानंतर मुलांची अशाप्रकारे काळजी घ्या:






