Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅसिव्ह स्मोकिंग ठरतेय धोकादायक, धुम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका

पॅसिव्ह स्मोकिंग हे शरीरासाठी घातक असते. जे धुम्रपान करत नाहीत त्यांनाही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका अधिक आहे असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. नक्की काय आहे हा प्रकार जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 31, 2025 | 07:36 PM
पॅसिव्ह स्मोकिंगचा काय त्रास होतो (फोटो सौजन्य - iStock)

पॅसिव्ह स्मोकिंगचा काय त्रास होतो (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक आरोग्य संघटनेकडून ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवासानिमित्त तंबाखूच्या सेवनाविरोधी जनजागृती केली जाते. या निमित्ताने आपण या सेकंड हॅंड स्मोकिंग (पॅसिव्ह स्मोकींग) म्हणजे काय आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात हे जाणून घेणार आहोत. धूम्रपान न करताही अनेक व्यक्ती कर्करोगाचा बळी ठरत आहेत. सध्या भारतात एकूण कॅन्सरमध्ये १० ते १२ टक्के फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येत असले तरी २०३० पर्यंत हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे.

Passive Smoking हे अत्यंत त्रासदायक असू शकते. आज नो टोबॅको डे असल्याने याचे महत्त्व जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनादेखील फुफ्फुस कर्करोगांचा धोका उद्भवू शकतो असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तंबाखूच्या सेवनाविरोधी जनजागृती पसरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

No Tobacco Day: पालकांची भूमिका महत्त्वाची, मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

काय सांगतो अहवाल

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित धूम्रपान न करणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि यात जास्त महिलांचा समावेश आहे.पॅसिव्ह स्मोकिंग याला सेकंड हॅन्ड स्मोकिंग देखील म्हणतात. यामध्ये, व्यक्ती थेट धूम्रपान करत नाही, परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या सिगारेटमधून निघणाऱ्या धुरामुळे त्याला धोका निर्माण होतो. अशामुळे धूम्रपान न करणार्‍यांमध्ये या धुरामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका 24 टक्क्यांनी वाढतो. निष्क्रीय धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाची प्रकरणे सतत वाढत आहेत.

कसे होते नुकसान 

सेकंड आणि थर्ड हँड स्मोकमधील कार्सिनोजेन्समुळे धूम्रपान न करणाऱ्यांना फुफ्फुस, घसा आणि ब्रेस्ट कॅन्सरसह विविध प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. या विषारी पदार्थांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे फुफ्फुसाच्या पेशी आणि शरीराच्या इतर भागांमधील डीएनएचं नुकसान होऊन कॅन्सरपेशी तयार होऊ शकतात.

टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. गौरव जसवाल सांगतात की, फुप्फुसांच्या कर्करोगाच्या पूर्वलक्षणांमध्ये दीर्घकाळ खोकला व कफ असणे, खोकल्याद्वारे आणि कधी थुंकीद्वारे रक्त येणे, श्वास घेताना त्रास होणे, आवाजात बदल होणे, सतत फुप्फुसाचे इन्फेक्शन व न्यूमोनिया होणे. सोबतच दीर्घकाळ ताप असणे, अशक्तपणा, वजन कमी होणे ही लक्षणेही आढळून येतात. वरील लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तेवरीत वैद्यकिय सल्ला घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यातील केस कोरडे आणि निस्तेज होतात? मग जास्वंदीच्या फुलांपासून घरीच तयार करा हेअर मास्क, केस होतील मऊ

फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजे काय?

फुफ्फुसांचा कर्करोग फुफ्फुसातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. जगभरात कर्करोगाच्या मृत्यूचे हे एक प्रमुख कारण आहे, विशेषतः धूम्रपान करणाऱ्यांमध्ये. फुफ्फुसांचा कर्करोग दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागला जातो: नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर (SCLC).

लक्षणे:

फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:

  • सतत येणारा खोकला जो बरा होत नाही
  • खोकल्यातून रक्त येणे
  • खोकल्यातून रक्त येणे
  • खोल श्वास घेतल्यावर किंवा खोकल्यावर छातीत दुखणे वाढते
  • घशाचा त्रास होणे 
  • भूक न लागणे किंवा वजन कमी होणे, थकवा येणे 
कारणे:

फुफ्फुसांच्या कर्करोगाचे सर्वात सामान्य कारण म्हणजे धूम्रपान. धूम्रपान करणाऱ्या लोकांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका खूप जास्त असतो. इतर कारणांमध्ये हे समाविष्ट आहे: एस्बेस्टोस किंवा इतर हानिकारक पदार्थांचा संपर्क, काही पर्यावरणीय घटकांचा संपर्क, अनुवांशिक कारणेदेखील त्याला कारणीभूत ठरतात 

Web Title: Passive smoking is becoming dangerous even non smokers are at risk of lung cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 07:36 PM

Topics:  

  • Health Tips
  • quite smoking tips
  • smoking

संबंधित बातम्या

‘2 वेळा गरोदर राहिले पण दोन्ही वेळा Abortion Pill खाल्ली, आता बाळच होत नाही’, डॉक्टरांनी समजावले कारण
1

‘2 वेळा गरोदर राहिले पण दोन्ही वेळा Abortion Pill खाल्ली, आता बाळच होत नाही’, डॉक्टरांनी समजावले कारण

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…
2

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…

Pregnancy Tips: ‘७ वर्ष आई होण्यासाठी करतेय संघर्ष’; अखेर पीआरपीसारख्या नव्या उपचार पद्धतीचा केला वापर आणि…
3

Pregnancy Tips: ‘७ वर्ष आई होण्यासाठी करतेय संघर्ष’; अखेर पीआरपीसारख्या नव्या उपचार पद्धतीचा केला वापर आणि…

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण
4

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.