'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो Stomach Cancer चा सर्वाधिक धोका; तुमचे नाव तर यात सामील नाही?
आताच्या काळात अनेकांची जीवनशैली फार बिघडली आहे ज्यामुळे आजारांचा धोका फार वाढला आहे. वाढते मृत्यूचे प्रमाण पाहता आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आजकाल अनेकजण कँसरच्या आजराशी झुंज देत आहेत अशात वेळीच हा धोका ओळखून यावर उपचार घेतल्यास आपण आपले आयुष्य सुरक्षित करू शकत. कर्करोग हा अनेक प्रकारचा असतो त्यातीलच एक म्हणजे पोटाचा कर्करोग. तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या रक्तगटामुळे पोटाचा कर्करोग होण्याचा धोका हा अनेक पटींनी वाढत असतो… चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
जन्मतःचा आपण एका विशिष्ट रक्तगटामध्ये मोडले जातो. जगातील बहुतेक लोक A, B, AB किंवा O या चार रक्तगटांमध्ये मोडतात. ही अक्षरे तुमच्या लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर साखर आणि प्रथिने (अँटीजेन) यांचे संयोजन दर्शवतात. ते अँटीबॉडीजशी देखील जोडलेले असतात, जे आपल्या रक्त प्लाझ्मामध्ये असतात. याशिवाय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रक्तगट तुमच्या रक्तात कोणता Rh फॅक्टर अँटीजेन आहे हे दर्शवते.
रक्तगट आजाराचा धोका वाढवतो?
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमचा रक्तगट तुम्हाला कोणते आजार जडणार हे सांगत असतो. २०१९ मध्ये बीएमसी कॅन्सरने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार,रक्तगट A आणि AB असलेल्या लोकांना पोटाचा कर्करोग होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. या अभ्यासात असे दिसून आले की, रक्तगट A आणि AB असलेल्या लोकांना पोटाचा कर्करोग होण्याचा धोका १८ टक्क्यांनी जास्त असतो. संशोधानुसार असे आढळून आले की, , रक्तगट A असलेल्या लोकांना कर्करोग होण्याचा धोका १९ टक्के जास्त असतो तर AB रक्तगट असलेल्या लोकांना ९ टक्के कर्करोगाचा धोका जास्त असतो. अन्य रक्तगट असलेल्या लोकांनाही कर्करोगाचा धोका असतो मात्र या दोन रक्तगटांमध्ये काही जैविक फरक आहेत, ज्यामुळे त्यांना पोटाच्या कर्करोगाचा धोका सर्वात जास्त आहे.
संशोधनात काही जुन्या अहवालांचाही उल्लेख करण्यात आला असून ज्यानुसार, A रक्तगट असलेल्या लोकांना हेलिकोबॅक्टर पायलोरीचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. हेलिकोबॅक्टर पायलोरी हा एक प्रकारचा जीवाणू आहे जो पोटाच्या कर्करोगाशी संबंधित आहे. A किंवा AB रक्तगट असलेल्या लोकांना याचा धोका असो वा नसो पण पोटाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतोच. या लोकांना हेलिकोबॅक्टर पायलोरीचा संसर्ग झाला तर पोटाचा कर्करोग होण्याची खूप जास्त शक्यता असते. जगभरात कर्करोग हा आजार पाचवा क्रमांकाचा सामान्य आजार बनला आहे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून पुरुषांना याचा सर्वाधिक धोका असतो.
रक्तगटाचा पोटातील आम्लावर परिणाम होतो का?
हो,पोटातील आम्लाचे प्रमाण रक्तगटानुसार बदलते
कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला कर्करोगाचा धोका कमी असतो?
O रक्तगटाच्या व्यक्तीला कर्करोगाचा धोका कमी असतो
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.