कबुतरांच्या विष्ठेमुळे उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित 'हे' गंभीर आजार
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कबुतरांना दाणे टाकायला खूप जास्त आवडतात. कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर कबुतर खाना दिसल्यास सगळ्यात आधी तिथे असलेल्या कबुतरांना तांदूळ, गहू किंवा मक्याचे दाणे टाकले जातात. मक्या प्राण्यांना किंवा पक्षांना अननपदार्थ देणे म्हणजे पुण्य अशी अनेकांची समज आहे. बरीच लोक स्वतःच्या खिशातील पैसे देऊन किंवा घरातील दाणे, तांदूळ आणून कबुतरांना खायला देतात. पण कबुतरांच्या जवळ जाणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कबुतरांच्या जवळ गेल्यामुळे आरोग्याला कोणती हानी पोहचते? कबुतरांच्या विष्टेमुळे कोणते गंभीर आजार होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
कबुतरांना दाणे टाकणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तसेच आरोग्यासंबंधित अनेक जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात. मात्र आपल्यातील अनेकांना ही गोष्ट माहित नाही. कबुतरांची विष्ठा मानवी आरोग्यासाठी घातक ठरते. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कबुतराने खाऊ घालणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कबुतर खाना आणि आजूबाजूच्या पाळीव कबुतरांना मोठ्या प्रमाणावर दाणे खायला दिले जातात. कबुतरांना खायला मिळू लागल्यामुळे मुंबईसह इतर अनेक ठिकाणी कबुतरांची संख्या वाढली आहे. अर्बन इकोलॉजिस्ट कबुतरांना ‘उडणारे उंदीर’ असे म्हणतात. कारण कबुतर उंदरांप्रमाणे अधिक प्रजनन, आजार पसरवण्याची क्षमता आणि सार्वजनिक उधवस्त करून टाकतात.
कबुतर घराच्या बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये किंवा घराच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या ठिकाणी राहतात. पण त्याच्या विष्ठेमुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर आजार पसरू लागतात. कबुतरांची विष्ठा आजूबाजूच्या परिसरात पसरल्यामुळे यूरिक अॅसिड आणि अमोनियाचे प्रमाण अधिक वाढू लागते. याशिवाय घातक बॅक्टेरिया आणि फंगस वाढून त्वचेसंबंधित समस्या उद्भवतात.
कबुतरांच्या विष्ठेमुळे हिस्टोप्लास्मोसिस आजार होण्याची शक्यता असते. कबुतरांची वाळलेली विष्ठा श्वासाद्वारे शरीरात गेल्यानंतर फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन वाढू लागते.
फुफ्फुस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी
क्रिप्टोकॉकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे. क्रिप्टोकॉकोसिस झाल्यानंतर मेंदू आणि फुफ्फुस प्रभावित होऊन आरोग्याला हानी पोहचते. तसेच पंख आणि विष्ठेचे कण श्वसनलिकेमध्ये गेल्यानंतर अॅलर्जिक लंग डिजीज होऊन संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. तसेच फुफ्फुस निकामी होऊन जातात. दीर्घकाळ कबुतरांच्या संपर्कात राहिल्यामुळे जुना खोकला, श्वासाची समस्या आणि फुप्फुसांमध्ये सूज वाढण्याची जास्त शक्यता असते.
कबुतराच्या विष्ठेशी संबंधित आरोग्याला निर्माण होणारे धोके:
कबुतराच्या विष्ठेमध्ये बॅक्टेरिया, बुरशी आणि प्रथिने असू शकतात ज्यामुळे ऍलर्जीक प्रतिक्रिया आणि श्वसन संक्रमण होऊ शकते. वाळलेल्या विष्ठेतील धूळ श्वास घेतल्याने दमा आणि ऍलर्जी वाढू शकतात आणि अतिसंवेदनशील न्यूमोनिया होऊ शकतो.