
बंगळूरजवळ फक्त 10,000 रुपयांत लुटा एडवेंचर ट्रिपची मजा; अशी करा 3 दिवसांची ट्रिप प्लॅन
कमी पैशांमध्ये जर तुम्हाला आपल्या जोडीदारासोबत सुंदर ट्रिप प्लॅन करायची असेल तर बंगळूरजवळील कबीनी हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तुम्ही फक्त 10,000 रुपयांत इथे 3 दिवसांची मजेदार ट्रिप प्लॅन करू शकता, फक्त यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
पहिला दिवस : जेवणाचा आस्वाद आणि बोट सफारीचा आनंद घ्या
सकाळी लवकर निघा, म्हणजे मार्गातील निसर्गाचा आनंद घेता येईल. वाटेत मैसूरमध्ये थांबून गरमागरम डोसा आणि फिल्टर कॉफीचा नाश्ता करा. काबिनीला पोहोचल्यानंतर राहण्यासाठी अनेक बजेट-फ्रेंडली पर्याय उपलब्ध आहेत जसे काबिनी लेक व्ह्यू रिसॉर्ट (Kabini Lake View Resort), रेड अर्थ इको कॉटेज (Red Earth Eco Cottages) किंवा काबिनी रिव्हर लॉज (Kabini River Lodge), ज्यांची किंमत साधारण ₹2000 प्रति रात्रापासून सुरू होते.
टाईम ट्रॅव्हल सारखा अनुभव देतात भारतातील ही ठिकाणे, कुटुंबासह एकदा नक्की भेट देऊन पाहा
संध्याकाळी काबिनी नदीवरील बोट सफारीचा अनुभव घ्या (₹800–₹1200 प्रति व्यक्ती). शांत पाण्यातून फिरताना हात्ती नदीत अंघोळ करताना किंवा मगर उन्हात पहुडलेल्या दिसतात. रात्री तारकांनी भरलेल्या आकाशाखाली स्थानिक पद्धतीचा जेवणाचा आस्वाद घ्या… भात, डाळ, भाजी किंवा हलका मांसाहारी मेन्यू.
दुसरा दिवस: जंगल सफारी आणि नेचर वॉक
सकाळी लवकर उठा आणि नागरहोल नॅशनल पार्कमधील जंगल सफारीला निघा (₹500–₹600 प्रति व्यक्ती). येथे वाघ, हरिण, रानकुत्री आणि असंख्य पक्षी पाहायला मिळतात. वाघ दिसेल याची खात्री नसली तरी जंगलातील शांतता आणि गूढ वातावरण स्वतःमध्ये जादुई आहे. दुपारी थोडा आराम करून नेचर वॉक (₹200–₹400 प्रति व्यक्ती) करा. स्थानिक गाईडच्या मदतीने झाडं, पक्षी आणि प्राण्यांच्या पाऊलखुणांविषयी जाणून घेणे एक अनोखा अनुभव ठरेल. संध्याकाळी नदीकाठी बसून सूर्यास्ताचा नजारा मनात शांती निर्माण करतो.
तिसरा दिवस: गाव सफर आणि परतीचा प्रवास
सकाळी स्थानिक गाव किंवा प्लांटेशन टूर (₹150–₹300 प्रति व्यक्ती) करा. येथे तुम्हाला स्थानिक लोकांची साधी, निसर्गाशी जोडलेली जीवनशैली जवळून पाहता येईल. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू करा आणि मैसूरमध्ये थांबून पारंपरिक साऊथ इंडियन जेवणाचा आस्वाद घ्या.
नर्तकीच्या प्रेमात राजाने बनवला भव्य आणि सुंदर किल्ला, पण एक कटाने सर्वच नष्ट केलं; काय आहे कथा?
ट्रिपचा अंदाजे खर्च (दोघांसाठी – ३ दिवस, २ रात्री):
काबिनी ही अशी जागा नाही की फक्त पाहून संपेल; ती मनाने अनुभवण्याची जागा आहे. निसर्गाच्या कुशीत काही क्षण घालवताना तुम्ही स्वतःशी आणि आपल्या साथीदाराशी नव्याने नातं जुळवता आणि तोच काबिनीचा खरा मोह आहे.