Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: अन्नदात्याला न्याय मिळाला का? अर्थसंकल्पावरून राजकीय वाद पेटला; सत्ताधाऱ्यांकडून कौतुक, विरोधकांची टीका

अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर याबाबत विरोधकांकडून टिका केली जात आहे. अर्थसंकल्पावर अनेकांनी टीका केली आहे. अन्नदात्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 02, 2026 | 01:21 PM
Chandrapur News: अन्नदात्याला न्याय मिळाला का? अर्थसंकल्पावरून राजकीय वाद पेटला; सत्ताधाऱ्यांकडून कौतुक, विरोधकांची टीका

Chandrapur News: अन्नदात्याला न्याय मिळाला का? अर्थसंकल्पावरून राजकीय वाद पेटला; सत्ताधाऱ्यांकडून कौतुक, विरोधकांची टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • अर्थसंकल्पावर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया!
  • अन्नदात्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
  • अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी अपुरा? जिल्ह्यातून उठले सवाल
चंद्रपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा वार्षिक अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी (दि. १) संसदेत सादर केला. देशात सध्या वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भावाची प्रतीक्षा, अशा अनेक समस्या तीव्र होत असताना या अर्थसंकल्पाकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष लागलेले होते. अशा परिस्थितीत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाने देशातील कोणत्या क्षेत्रांसाठी काय दिले गेले, यावर जिल्ह्यातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यात सत्ताधाऱ्यांकडून कौतुकाची थाप, तर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पावर अनेकांनी टीका केली आहे.

Sanjay Raut on Ajit Pawar: ‘दादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का….? संजय राऊतांचा गंभीर सवाल

अर्थसंकल्पात जनसामान्य, शेतकरी, तरुण, महिला व उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.- हरीश शर्मा, जिल्हाध्यक्ष, भाजप

पश्चिम बंगाल, आसाम तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत, म्हणूनच अर्थमंत्र्यांनी या राज्यांसाठी तिजोरीचे दरवाजे उघडल्याचे नाटक केले आहे. हा देशाचा अर्थसंकल्प नाही तर भाजपचा ‘निवडणूक जाहीरनामा’ आहे, असेचं वाटत आहे. खतांच्या किमती वाढल्या आहेत. मात्र हमीभाव नाहीं, महागाई व रोजगारासाठी कोणतीही तरतूद नाही. सरकारने केवळ आकडेवारीचा खेळ मांडला. सामान्यांचा खिसा रिकामाच राहणार आहे. – प्रतिभा धानोरकर, खासदार, चंद्रपूर. (फोटो सौजन्य – X)

अर्थसंकल्पात लघु व मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रविवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात उद्योग पर्यटनाचीही तरतूद करण्यात आली आहे. तसेच बॅटरी इलेक्ट्रानिक उद्योगासाठी तरतूद करण्यात आली आहे. रासिवाय त्वे, रस्ते बांधकामाला वाव देण्यात आले आहे. एकंदरीत गुंतवणुकीला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. – मधुसूदन संगठा, अध्यक्ष, एमआयडीसी औद्योगिक संघटना

अर्थसंकल्यात गरीब, शेतकरी, महिला, तरुण, मध्यमवर्ग, उद्योजक आणि देशाच्या सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवत संतुलित आणि भविष्याभिमुख तरतुदी करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीवर प्रामुख्याने भर देण्यात आला, रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, लॉजिस्टिक्स व शहरी पायाभूत सुविधा यासाठी भरीव तरतुदी करून रोजगार निर्मितीला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, कृषी व ग्रामीण विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. – सुधीर मुनगंटीवार, आमदार, माजी अर्थमंत्री

या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला तरुण, कामगार, मध्यमवर्ग तसेच लघु व मध्यम उद्योगांना केंद्रस्थानी ठेवत देशाच्या आर्थिक बळकटीसाठी दूरदृष्टीपूर्ण आणि निर्णायक पावले उचलण्यात आली आहेत. यात एमएसएमई क्षेत्रासाठी १० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करून लघु व मध्यम उद्योगांना नवसंजीवनी देण्यात आली. पशुपालनासाठी कर्जसंबंधित अनुदान योजना, मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी ५०० नवीन जलाशयांच्या उभारणीसाठी महत्त्वाचा आहे.- किशोर जोरगेवार, आमदार

भौमितिक आकारांतून आयुष्य मांडणारे ‘काळाघोडा’चे प्रवेशद्वार! प्लास्टिकचा पुनर्वापर करत पर्यावरणीय संदेश

महाराष्ट्र सर्वांत जास्त कर देणारा राज्य असूनही राज्याला आजच्या अर्थसंकल्पातून भोपळा देण्यात आला आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीविकासासाठी ठोस निधीची कोणतीही तरतूद नाही. देशाच्या अन्नदात्याला मात्र पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडले आहे. मागास घटकाच्या विकासाची तरतूद नाही. रोजगारासाठी भरीव निधी नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांची जुमलेबाजी दाखवून सामान्यांच्या खिशातून पैसे काढून मोजक्या उद्योगपतींचे खिसे भरण्याचा प्रयत्न आहे. – विजय वडेट्टीवार, आमदार तथा विधिमंडळ नेते

शेतमालाला महागाई, हमीभाव, कर्जमाफी, आरोग्य व शिक्षण या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडून ठोस उपाययोजना नाही. शेतक-यांच्या उत्पन्नवाढीबाबत कोणतीही ठोस घोषणा नसून, खत, बियाणे व डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तरुणांच्या रोजगारासाठी ठोस योजना नसून, केवळ घोषणा आणि आश्वासनांची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. सुभाष घोटे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष

Web Title: Did farmers get justice budget sparks political clash ruling party praises opposition slams chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Budget
  • Chandrapur
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
1

Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त
2

Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

“जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण…”; Union Budget 2026 वर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया
3

“जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण…”; Union Budget 2026 वर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया

Feat वसूली ताई…! Budget 2026 जाहीर होताच नेटकऱ्यांनी अर्थमंत्र्यांना घेरलं, मजेदार MEMES VIRAL
4

Feat वसूली ताई…! Budget 2026 जाहीर होताच नेटकऱ्यांनी अर्थमंत्र्यांना घेरलं, मजेदार MEMES VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.