फोटो सौजन्य: iStock
आपल्या भारतात सध्या नवरात्री आणि दसऱ्याचा उत्साह उफाळून आला आहे. सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्सव सुरू असून दोन दिवसांवर दसरा देखील आला आहे. दरवर्षी देशभरात दसऱ्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी रावण दहणाचे आयोजन केले जाते. रावण दहन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षित करते. यंदा दसरा शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. असून या विशेष दिवशी बाहेर जाऊन उत्सवाचा आनंद घेण्याची संधी आहे.
जर तुम्ही रावण दहन पाहण्याचा विचार करत असाल तर दिल्लीतील या निमित्ताने दिल्ली हे दसऱ्याचे रावण दहन पाहण्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरू शकते. दिल्लीमध्ये दरवर्षी दसऱ्याला मोठ्या थाटामाटात रावण दहन आणि रामलीला आयोजित करण्यात येते. यासाठी तुम्हाला दिल्लीतील काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत जिथे दसऱ्याच्या उत्सवाचा आनंद घेता येईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रपरिवारासोबत नक्की भेट देऊ शकता.
दिल्लीतील रावण दहण पाहण्यासारखी काही उत्तम ठिकाणे
लाल किल्ला– दिल्लीतील रावण दहनासाठी सर्वात प्रमुख ठिकाण म्हणजे लाल किल्ला परिसर, जिथे दरवर्षी भव्य रामलीला आयोजित केली जाते. या ठिकाणी हजारो लोक रावण दहण पाहण्यासाठी एकत्र येतात. यासोबतच येथे भरणाऱ्या जत्रेत मोठमोठे झुले आणि शॉपिंग स्टॉल्स हे लोकांचे आकर्षण ठरतात. कुटुंबासह या ठिकाणी दसऱ्याचा आनंद लुटणे एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो.
हे देखील वाचा – कोलकाताचे Maa Phire Elo Museum; कला आणि श्रद्धेचे अद्भुत संगम, नक्की भेट द्या
नेताजी सुभाष प्लेस– याशिवाय दसऱ्याच्या दिवशी नेताजी सुभाष प्लेस हे देखील दिल्लीतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे दरवर्षी भव्य जत्रा भरते, जिथे रावण दहनाचा साक्षीदार होण्यासाठी हजारो लोक उपस्थित असतात. या उत्सवाचे वैभव आणि आनंद तुम्ही कुटुंबासह अनुभू शकता. तसेच तुमच्या मित्रसोबत देखील जाऊ शकता.
दिल्लीतील द्वारका– आणखी एक रावण दहन पाहण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे, दिल्लीतील द्वारका, येथे सेक्टर 10 मध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात रावण दहणाचे आयोजन केले जाते. इथे दिल्लीतील सर्वात मोठा रावण दहण पाहायला मिळतो. येथे जाण्यासाठी मेट्रोने प्रवास करणे सहज शक्य आहे, त्यामुळे या ठिकाणी पोहोचणे सोपे आणि सोयीचे आहे.
दिल्लीतील पंजाबी बाग आणि रोहिणी– दिल्लीतील पंजाबी बाग आणि रोहिणी भागातही दसरा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या ठिकाणी रावण दहन पाहण्यासाठी लोक लांबून येतात. मित्र आणि कुटुंबासोबत या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही दसऱ्याचा आनंद घेऊ शकता. दिल्लीतील या ठिकाणी दसरा साजरा करून उत्सवाचा अनुभव घेण्याची संधी चुकवू नका.