राजकीय सोयीसाठी पडलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धत चुकीची असून ती रद्द करावी अशी मागणी आज अॅड. असीम सरोदे यांनी केली आहे. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.सत्तेत असलेल्या आणि सत्तेत नसलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय हेतूने प्रभाग पाडून घेतले.त्यामुळे वार्डात एक मत आणि नगरसेवक ही पद्धत बाजूला पडली असल्याचं सरोदे यांनी म्हटलं. प्रभाग पडणं हे राज्य सरकारच्या अधिकारात येत असलं तरी त्याचा हेतू वेगळा आहे.आपल्या सोयीच्या उमेदवारासाठी सोयीनुसार प्रभाग पडून घेतले जातात..त्यामुळे एखाद्या वार्डात प्रामाणिकपणे समाजसेवा करणारा कार्यकर्ता बाजूला पडतो..शिवाय बहुसदस्यीय प्रभागात कुणावर कुठली जबाबदारी हे स्पष्ट केलेले नसतं. त्यामुळे जनतेने कुणाकडे दाद मागायची हा देखील प्रश्न निर्माण होतो..शिवाय महाराष्ट्र सोडून देशातील कोणत्याही राज्यात बहुसदस्यीय प्रभाग रचना नाही असही सरोदे यांनी म्हटलं आहे.