Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्रायलचे पंतप्रधा बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Nenyahu) यांनी हमासला संपुष्टात आणण्याचा आपला विचार पक्का केला आहे. यामुळे गाझावर नियंत्रण मिळवण्याच्या योजने अंतर्गत आता इस्रायल गाझामध्ये अतिरिक्त ५० हजार सैनिक तैनात करणार असल्याची माहिती मिळाली आहे. हमासला गुडघे टेकायला मजबूर करण्याच्या मार्गावर हा एक नवीन टप्पा असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्याने बुधवारी (२० ऑगस्ट) याची माहिती दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गाझाच्या दाट लोकवस्तीतूनही हमासला हाकलण्यात येणार आहे. यामुळे इस्रायलने कारवाई सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायली सरकारने गाझामध्ये ५० हजार सैनिकांच्या तैनातीला मान्यता दिली आहे.
गाझा शहराच्या दाट लोकवस्ती असलेल्या आणि कारवाया न झालेल्या भागांमध्ये हे सैनिक तैनात केले जाणार आहे. इस्रायलच्या मते गाझाच्या अनेक भागांमध्ये असजूनही हमास सक्रिया आहे. यामुळे ही कारवाई अत्यंत महत्वाची आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आता हमासचा अंत जवळ आला असल्याचे म्हटले आहे. हमासविरोधी कारवाई अंतिम टप्प्यात असून त्यांचा एकही पाऊलखुणा राहणार नाहीत असे नेतन्याहूंनी म्हटले आहे.
इस्रायली अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने गाझात ५० हजार सैनिक तैनातीला मंजूरी दिली आहे. यामुळे आता हमास दहशतवादी जिंवत राहणार नाही. सध्या ही मोहिम कधी सुरु होणार याचा माहिती नाही, परंतु सैनिकांच्या तैनातीला हळू हळू सुरुवात झाली आहे. सध्या गाझामध्ये १,२० हजार सैनिक तैनात असून आणखी सैनिक हमाससाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.
इस्रायलने हमासला स्वत:हून शस्त्र सोडण्याचीही संधी दिली आहे. तसेच ओलिसांना सोडण्याचेही म्हटले आहे. सध्या हमासने अर्ध्या इस्रायली ओलिसांची सुटाक केली आहे. परंतु शस्त्र खाली टाकण्यास नकार दिला आहे. पॅलेस्टिनींनी स्वतंत्र राज्य मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरुच राहिल, अगदी शेवटपर्यंत असे हमासने म्हटले आहे.
गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?






