भांडुपमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. पन्नालाल कंपाऊंड परिसरात 17 वर्षीय दीपक पिल्ले याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. भर पावसात कानात हेडफोन घालून घरी जात असताना तो महावितरणाच्या खुल्या हाय-टेंशन वायरच्या संपर्कात आला आणि जागीच कोसळला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हेडफोनमुळे दीपकला दिलेला इशारा ऐकू आला नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडली. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच या धोकादायक वायरबाबत सतत सूचना केल्या होत्या.