Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pneumonia Day: न्यूमोनियाचा धोका वृद्धांना जास्त का असतो? लक्षणे, कारणे आणि उपचारांचे पर्याय

न्यूमोनिया हा असा आजार आहे ज्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास जीव जाऊ शकतो. बरेचदा याची लक्षणे कळत नाहीत पण वेळेवर उपचार केल्यास तुमचा जीव वाचण्यास मदत मिळू शकते, जाणून घ्या अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 12, 2025 | 10:40 AM
जागतिक न्यूमोनिया दिन का साजरा केला जातो, वृद्धांना अधिक का होतो (फोटो सौजन्य - iStock)

जागतिक न्यूमोनिया दिन का साजरा केला जातो, वृद्धांना अधिक का होतो (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • न्यूमोनिया जागतिक दिन 
  • वृद्धांमधील लक्षणे काय आहेत 
  • न्यूमोनिया लक्षणे, उपाय आणि प्रतिबंध 

न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसांना होणारा एक गंभीर संसर्ग, जो कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. पण वृद्ध लोकांसाठी धोकादायक आहे. वाढत्या वयाबरोबरीने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते आणि फुफ्फुसाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. याची कारणे, सुरुवातीची लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे. वेळेवर योग्य उपचार केल्यास हा धोका कमी होऊ शकतो. डॉ. विनोद चव्हाण, कन्सल्टंन्ट, चेस्ट फिजिशियन आणि पल्मोनोलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

World Pneumonia Day: ‘या’ लोकांना असतो न्यूमोनियाचा सर्वाधिक धोका, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे

वृद्ध व्यक्तींना न्यूमोनियाचा धोका जास्त का असतो?

याची अनेक कारणे असू शकतात, त्याबाबत आपण या लेखातून अधिक माहिती घेऊ 

  • रोगप्रतिकारशक्ती कमजोर झालेली असणे – व्यक्तीचे वय वाढत जाते तसतशी रोगप्रतिकारक प्रणाली कमकुवत होत जाते आणि रोगजंतू व विषाणूंच्या विरोधात लढण्याची शरीराची क्षमता कमी होते
  • दीर्घ काळापासूनचे आजार – मधुमेह, सीओपीडी, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार तसेच किडनीचे आजार हे आधीच कमकुवत असलेल्या प्रतिकारशक्तीला अधिकच दुर्बल करतात. फुफ्फुसांचे कार्य मंदावते
  • खोकल्याचा प्रतिक्षेप (Cough Reflex) कमी होणे आणि शारीरिक हालचाल मर्यादित असणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते
  • अन्न किंवा द्रवपदार्थ श्वासमार्गात गेल्यास खोकला येण्याची नैसर्गिक प्रतिक्षेप क्रिया (natural reflex action) वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत मंदावते किंवा कमी प्रमाणात होते. यामुळे, श्वासमार्गात गेलेले पदार्थ बाहेर काढले जात नाहीत आणि व्यक्तीला धोका वाढतो. शारीरिक हालचाली कमी असणे, दीर्घकाळ अंथरुणावर पडून राहणे किंवा गिळण्यास त्रास होणे यामुळे ‘एस्पिरेशन न्यूमोनिया’ होण्याचा धोका वाढतो. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या श्वासनलिका किंवा फुफ्फुसांत अन्न आणि द्रवपदार्थ जातात. योग्य वेळी खोकल्याची प्रतिक्षेप क्रिया न झाल्यामुळे हे पदार्थ फुफ्फुसांत अडकून संसर्ग होऊ शकतो
  • रुग्णालयात भरती करावे लागणे- रुग्णालय किंवा दीर्घकाळपर्यंत केयर फॅसिलिटीमध्ये राहावे लागणाऱ्या वृद्ध व्यक्तींना फुफ्फुसांचे संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. अशा ठिकाणी त्यांचा संपर्क अधिक विषारी आणि औषधांना प्रतिरोध करणाऱ्या जीवाणूंशी येऊ शकतो. हे जीवाणू फुफ्फुसांच्या संसर्गास कारणीभूत ठरतात.

कोणती लक्षणे वृद्धामध्ये दिसतात  

  • सततचा खोकला: हा खोकला कफयुक्त किंवा कोरडा असू शकतो. तो दीर्घकाळ टिकू शकतो
  • ताप आणि थंडी वाजणे किंवा घाम येणे: काही वृद्ध रुग्णांना ताप येत नाही, तरीही ही लक्षणे दिसू शकतात
  • धाप लागणे किंवा जलद श्वास घेणे: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा वेगाने श्वास घेणे
  • छातीत दुखणे किंवा अस्वस्थता: श्वास घेताना किंवा खोकताना छातीत काही प्रमाणात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे
  • थकवा आणि अशक्तपणा किंवा भूक न लागणे: थकवा, अशक्तपणा जाणवणे किंवा जेवणाची इच्छा कमी होणे
  • गोंधळ किंवा दिशाभूल: हे लक्षण अनेकदा वृद्ध रुग्णांमध्ये न्यूमोनियाचा पहिला संकेत असते.

ही लक्षणे अस्पष्ट असल्यामुळे आणि इतर आजारांच्या लक्षणांप्रमाणे दिसत असल्यामुळे, वृद्धांमध्ये न्यूमोनियाचे निदान उशिरा होऊ शकते. यामुळे सेप्सिस आणि श्वसन यंत्रणा निकामी होणे यांसारख्या गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता असते.

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू

निदान आणि उपचार 

शारीरिक तपासणी, छातीचा एक्सरे आणि काही रक्त तपासण्या करून कोणत्या प्रकारचा संसर्ग आहे हे समजून येऊ शकते. काही केसेसमध्ये कफ किंवा थुंकीची तपासणी करून देखील निदान केले जाऊ शकते. आजाराचे कारण आणि गांभीर्य यावर उपचार अवलंबून असतात 

  • न्यूमोनियासाठी अँटीबायोटिक्स पुरेशी ठरतात आणि जर उपचारात उशीर झाला किंवा पहिल्या टप्प्यात योग्य उपचार मिळाले नाहीत, तर कोणत्याही प्रकारच्या न्यूमोनियामध्ये गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते
  • विषाणूंमुळे होणाऱ्या न्यूमोनियामध्ये, मुख्यत्वे सहायक काळजी घेण्यास सांगितले जाते, जसे की, भरपूर विश्रांती घेणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे, आवश्यक असल्यास, रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास पूरक ऑक्सिजन पुरवणे. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये डॉक्टर इंट्राव्हेनस (IV) अँटीव्हायरल औषधे देण्याचा देखील सल्ला देऊ शकतात

लक्षणे खूप गंभीर असतील, किंवा रुग्णाला दीर्घकालीन आजार असतील, आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असेल, तर अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असते.

प्रतिबंध काय करावे 

  • वृद्ध व्यक्तींनी निरोगी राहण्यासाठी न्यूमोनिया होऊच नये यासाठी सजगतेने पावले उचलणे खूप गरजेचे आहे
  • लसीकरण हा प्रतिबंधाचा मोठा उपाय आहे. वार्षिक फ्लू लसीकरण आणि क्लाऊड न्यूमोनिया लस घेऊन धोका लक्षणीय प्रमाणात टाळता येईल
  • जीवनशैली आरोग्यापूरक असली पाहिजे. संतुलित, सुयोग्य, पोषक आहार, पुरेशा प्रमाणात पाणी, तरल पदार्थांचे सेवन, रोजच्या रोज शारीरिक व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे
  • धूम्रपान अजिबात न करणे खूप चांगले आहे, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या जवळपास न राहणे, घाणेरडी, प्रदूषित हवा टाळणे योग्य आहे. धूम्रपान आणि धुराच्या संपर्कात आल्याने फुफ्फुसांचे नुकसान होते, न्यूमोनियाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो
  • खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास होत असल्यास, त्वरित मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना दाखवावे कारण यांचे रूपांतर न्यूमोनियामध्ये होण्याची शक्यता दाट असते.

न्यूमोनिया हा वृद्धांच्या आरोग्याला एक गंभीर धोका आहे, परंतु योग्य माहिती आणि तत्पर कृती केल्यास तो टाळता येऊ शकतो आणि तरीही झालाच तर त्यावर सहज उपचार करता येतात. वृद्ध व्यक्तींच्या श्वसन आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पुढील काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत: लक्षणे लवकरात लवकर ओळखणे, आधीपासूनच्या आजारांकडे नीट लक्ष देणे आणि लसीकरणाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जागतिक न्यूमोनिया दिन कधी साजरा केला जातो?

    Ans: जागतिक न्यूमोनिया दिन—१२ नोव्हेंबर—हा दरवर्षी आठवण करून देतो की न्यूमोनिया कुठेही आणि कधीही होऊ शकतो आणि हा एक गंभीर, संभाव्य जीवघेणा फुफ्फुसांचा संसर्ग आहे.

  • Que: न्यूमोनियाचे दुसरे नाव काय आहे?

    Ans: न्यूमोनियाच्या इतर नावांमध्ये प्ल्युरीसी, प्ल्युरायटिस, न्यूमोनिटिस आणि फुफ्फुसांचा संसर्ग यांचा समावेश आहे. बॅक्टेरियल न्यूमोनियाला न्यूमोकोकल रोग देखील म्हणतात. सौम्य न्यूमोनियाला "चालणारा न्यूमोनिया" असेही म्हणतात.

  • Que: न्यूमोनियासाठी घोषवाक्य काय आहे?

    Ans: काही सामान्य घोषवाक्य आहेत: "प्रत्येक श्वास महत्त्वाचा आहे. न्यूमोनियाविरुद्धच्या लढाईत सामील व्हा."

Web Title: Pneumonia day why the elderly are at higher risk of pneumonia symptoms causes and treatment options

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

ट्रॅव्हलर्सने सिलेक्ट केले 2025 चे टॉप 10 देश; फिरण्यासाठीचे परफेक्ट डेस्टिनेशन
1

ट्रॅव्हलर्सने सिलेक्ट केले 2025 चे टॉप 10 देश; फिरण्यासाठीचे परफेक्ट डेस्टिनेशन

Liver Disease मुळे अभिनेत्याच्या शरीराचा झाला सांगाडा, 44 व्या वर्षी निधन; तरुणपणीच यकृत सडल्यास शरीरात दिसतात ही लक्षणं
2

Liver Disease मुळे अभिनेत्याच्या शरीराचा झाला सांगाडा, 44 व्या वर्षी निधन; तरुणपणीच यकृत सडल्यास शरीरात दिसतात ही लक्षणं

त्वचेला उजाळा देणाऱ्या क्रिम्सने डॅमेज होऊ शकते Kidney! रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, नक्की कसे जाणून घ्या
3

त्वचेला उजाळा देणाऱ्या क्रिम्सने डॅमेज होऊ शकते Kidney! रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, नक्की कसे जाणून घ्या

या तीन पैकी कोणत्याही एका ड्रिंकचे नियमित सेवन करा, काचेसारखा चकाकेल चेहरा; शरीरालाही आतून ठेवेल स्वछ
4

या तीन पैकी कोणत्याही एका ड्रिंकचे नियमित सेवन करा, काचेसारखा चकाकेल चेहरा; शरीरालाही आतून ठेवेल स्वछ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.