Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोट आणि आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ! सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘हे’ योगासन, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

वाढत्या बद्धकोष्ठता, पाठदुखी आणि शरीरसंबंधित इतर वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित ५ मिनिटं मलासन करावे. यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 21, 2026 | 08:12 AM
पोट आणि आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ! सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'हे' योगासन, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

पोट आणि आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ! सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'हे' योगासन, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Follow Us
Follow Us:

मलासन करण्याचे फायदे?
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी योगासन?
योगासन करण्याचे फायदे?

जीवनशैलीतील बदल आणि कामाच्या वाढत्या तणावामुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. याशिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे संपूर्ण वेळ निघून जातो. जीवनशैलीत झालेल्या अनेक बदलांमुळे केवळ शारीरिक आरोग्यालाच नाहीतर मानसिक आरोग्याला सुद्धा हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. तासनतास एका जागेवर बसून काम करत राहिल्यामुळे मानवी शरीराची नैसर्गिक रचना आणि लवचिकता हळूहळू नष्ट होत चालली आहे. याचा सगळ्यात जास्त पाठीचा मणका आणि पचनक्रियेला बसत आहे. याशिवाय तरुण वयातच बऱ्याचदा पाठीमध्ये वेदना होणे, कंबरदुखी, अपचन आणि जुनाट बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी अनेक गंभीर समस्या वाढू लागल्या आहेत.(फोटो सौजन्य – istock)

International Yoga Day 2026: योग म्हणजे जीवन…! जागतिक योग दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा

बऱ्याचदा पचनक्रिया बिघडल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार केले जातात. अपचन झाल्यानंतर गोळ्या किंवा कोणतेही सिरप पिऊन दिवस काढला जातो. पण वारंवार गोळ्या औषधांचे सेवन केल्यामुळे किडनीच्या आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. योगासन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी कोणती योगासने करावीत, चला तर जाणून घेऊया. सकाळी उठल्यानंतर ५ मिनिटं नियमित योगासने केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य सुधारेल.

पचनसंस्था व शौचावर वैज्ञानिक प्रभाव:

सकाळी उठल्यानंतर नियमित मलासन करावे. ही एक शारीरिक स्थिती आहे, ज्यामुळे शरीरातील टाकाऊ किंवा उत्सर्जित पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. मलासनाचा पचनसंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे वारंवार पचनक्रिया बिघडत असेल तर सकाळी उठल्यानंतर ५ मिनिटं मलासन करावे. हे आसन करताना शरीरातील स्नायू शिथिल होतात, ज्यामुळे मल सहज बाहेर पडून जातो. शरीरातील विषारी घाण बाहेर पडून गेल्यास कायमच तुम्ही हेल्दी राहाल. मलासनाच्या स्थितीत दोन्ही मांड्यांचा दाब पोटाच्या खालच्या भागावर पडतो, ज्यामुळे अंतर्गत अवयवांचे रक्ताभिसरण सुधारते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. यामुळे जुनाट बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस इत्यादी त्रासापासून सुटका मिळते.

मलासनात बसल्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार पाठीचा खालचा मणका आणि टेलबोन खालच्या दिशेने ताणले जातात. यामुळे पाठीच्या दोन मणक्यांमधील चकत्यांवर आलेला अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होते. तासनतास एका जागेवर बसून राहिल्यामुळे पाठीचे स्नायू कडक होतात. कंबर, मान आणि पाठीच्या स्नायूंमध्ये वाढलेला कडकपणा कमी करण्यासाठी मलासन करणे फायदेशीर ठरेल. मलासन करताना दोन्ही पायांमध्ये खांद्याच्या रुंदीपेक्षा जास्त अंतर ठेवावे. त्यानंतर खोल श्वास घेऊन श्वास सोडत हळूहळू गुडघे वाकवा. नितंब जमिनीच्या दिशेने आणावे आणि टाचा जमिनीवरून उचलू नयेत.

‘हॅबिल्ड’चा ऐतिहासिक 10 वा जागतिक विक्रम; ‘हर घर योगा’ला अभूतपूर्व प्रतिसाद

या व्यक्तींनी अजिबात करू नये मलासन:

गंभीर गुडघेदुखी
हिप किंवा घोट्याचे आजार
अलीकडील फ्रॅक्चर
तीव्र डिस्क प्रोलॅप्स
संतुलनाच्या समस्या

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: योगासनामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो का?

    Ans: काही योगासनांमुळे पोटाच्या भागातील स्नायूंना हालचाल मिळते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र परिणाम व्यक्तीनुसार वेगळे असू शकतात.

  • Que: बद्धकोष्ठतेसाठी सकाळी योग करणे फायदेशीर आहे का?

    Ans: सकाळी नियमित योग, पुरेसे पाणी आणि संतुलित आहार यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होऊ शकते.

  • Que: बद्धकोष्ठता होण्याची सामान्य कारणे कोणती?

    Ans: कमी पाणी पिणे, फायबरची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, अनियमित आहार आणि ताण यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

Web Title: Practice this yoga pose regularly after waking up in the morning to get relief from constipation garland pose

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • constipation
  • international yoga day
  • yogasana

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.