
गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज
Pregnancy Prevention: गर्भनिरोधक साधने उपलब्ध असणे पुरेसे नसून त्यांचा योग्य आणि सातत्यपूर्ण वापर, अचूक माहिती आणि कुटुंब नियोजनाबाबत दाम्पत्यांमध्ये संवाद तितकाच महत्त्वाचा आहे. २६ सप्टेंबरच्या जागतिक गर्भनिरोधक दिनाच्या निमित्ताने गर्भनिरोधक साधनांविषयी जनजागृती आणि अनियोजित गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजनाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या च्या २०२४-२५ आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २ लाख ७हजार १९ वैद्यकीय गर्भपात नोंदविण्यात आले आहेत.(फोटो सौजन्य – AI)
सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
देशातील विविध राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील ही संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबई पालिकेच्या कुटुंब कल्याण विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत मुंबईत २०,९५० गर्भपात नोंदविण्यात आले. यातील ७१६ प्रकरणे १९ वर्षांखालील मुलींची आहेत. मुंबईतील २०,६८५ प्रकरणांमध्ये गर्भपाताचे कारण नोंदविण्यात आले होते. त्यापैकी १९,४९५ प्रकरणांमध्ये गर्भनिरोधकाचा अपुरा किंवा चुकीचा वापर अथवा गर्भनिरोधक पद्धतीचे अपयश हे कारण नमूद केले. मात्र, याचा अर्थ केवळ गर्भनिरोधक साधने अपयशी ठरली असा होत नाही. योग्य पद्धत निवडणे, तिचा योग्य वापर करणे, सातत्य राखणे, संभाव्य दुष्परिणामांची माहिती असणे आणि आवश्यक वेळी वैद्यकीय समुपदेशन घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
66 गर्भपात हा महिलेचा आरोग्य हक्क आहे, मात्र पुरुषांनीदेखील जबाबदार लैंगिक वर्तन करणे आवश्यक आहे. महिलेला एका गर्भपाताचा त्रास एका बाळंतपणाएवढा होत असतो. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया ही महिलांनीच कराव्यात. पुरुष कधी सर्वेदनशील होऊन शस्त्रक्रिया व गर्भनिरोधक वापरण्यात पुढाकार घेतील? अशी माहिती वर्षा देशपांडे यांनी दिली आहे.
जागरूक मतदारांनो, SIR बाबत महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं घेतलाय मोठा निर्णय
महाराष्ट्रातील कुटुंब नियोजनाची व्यापक स्थिती पाहता, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-६च्या २०२३-२४च्या आकडेवारीनुसार १५ ते ४९ वर्षे वयोगटातील विवाहित महिलांमध्ये कोणतीही कुटुंब नियोजन पद्धत वापरण्याचे प्रमाण ६९.१ टक्के, तर आधुनिक गर्भनिरोधक पद्धतींचा वापर ५२.७ टक्के आहे. कुटुंब नियोजनाची एकूण अपूर्ण गरज ८.५ टक्के आहे. त्यामुळे जागतिक गर्भनिरोधक दिन जनजागृतीची व्यापकता वाढविण्याची संधी आहे.