Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pregnancy Tips: ‘वर्षानुवर्ष प्रयत्न करून बाळच होत नाहीये…’ त्वरीत सुधारा 5 चुका, नाहीतर Conceive करण्यात येतील भयंकर अडचणी

गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या जोडप्यांनी पाच प्रमुख जीवनशैलीच्या सवयींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. या सवयींमुळे गर्भधारणा होणे कठीण होऊ शकते. म्हणून, या गोष्टींकडे विशेषतः लक्ष द्या, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 21, 2026 | 12:58 PM
बाळ न होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात (फोटो सौजन्य- iStock)

बाळ न होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात (फोटो सौजन्य- iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • आहाराव्यतिरिक्त, जोडप्यांना पुरेशी झोप घेणे आणि तणाव टाळणे खूप महत्वाचे आहे
  • बाळ होण्यासाठी नक्की कोणत्या सवयी सोडूने देणे गरजेचे आहे जाणून घ्या
  • तज्ज्ञांच्या मते, जोडप्यांसाठी शारीरिक हालचाल देखील खूप महत्वाची आहे
गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या अनेक जोडप्यांना सर्व शक्य पद्धती वापरूनही गर्भधारणा होत नाही. हे नेहमीच वैद्यकीय समस्येमुळे होत नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये, रोजच्या वाईट सवयी मुख्य दोषी असतात. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नर्मदा यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यात त्या म्हणतात कीॉ, पाच छोट्या जीवनशैलीतील चुका हळूहळू प्रजननक्षमतेला हानी पोहोचवतात, जोडप्यांना ते कळत नाही. तर, गर्भधारणेला अडथळा आणणाऱ्या सवयींचा आपण या लेखातून अधिक विस्तारपूर्वक अभ्यास करूया. या सवयी नक्की कोणत्या आहेत जाणून घ्या. 

Pregnancy Tips: ‘७ वर्ष आई होण्यासाठी करतेय संघर्ष’; अखेर पीआरपीसारख्या नव्या उपचार पद्धतीचा केला वापर आणि…

काय सांगतात डॉक्टर 

आहाराकडे दुर्लक्ष 

डॉ. नर्मदा यांच्या मते, पहिली वाईट सवय म्हणजे जेवण वगळणे आणि संतुलित आहाराकडे दुर्लक्ष करणे. ही चांगली पद्धत नाही. सध्या अनेक जण कामाच्या ताणामुळे असेल अथवा कंटाळा केल्यामुळे जेवणाकडे आणि योग्य आहाराकडे लक्ष देत नाहीत. यामुळे केवळ आजारच निर्माण होत नाहीत तर बाळ न होण्याचेदेखील अथवा गरोदर न राहण्याचे हे मुख्य कारण ठरते. यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित हेल्दी आहार घेणे आणि वेळेवर जेवणे. 

सततचा ताण

दुसरी सवय म्हणजे जास्त ताण. सतत फोन कॉल, मल्टीटास्किंग आणि मानसिक ताण शरीराचे हार्मोनल संतुलन बिघडवतात. अनेक महिला उच्च स्तरावर काम करतात अथवा अगदी सामान्य ठिकाणी काम करत असणाऱ्या महिलांनाही कामाचा ताण, काम करत असणाऱ्या ठिकाणाच्या राजकारणामुळे येणारा मानसिक ताण या सर्व गोष्टींचा परिणाम हा शरीरावर होताना दिसून येतो आणि त्यामुळे बाळ होत नाही. 

Pregnancy Tips: गर्भधारणा होण्यासाठी शारीरिक संबंधांनंतर अर्धा तास तसंच झोपणं गरजेचे आहे का? काय आहे तथ्य

व्यायाम न करणे आणि उशीरापर्यंत जागं राहणं 

तज्ज्ञ पुढे स्पष्ट करतात की व्यायामाचा अभाव हे एक कारणीभूत घटक आहे. आजकाल लोक इतके व्यस्त आहेत की त्यांना शारीरिक हालचालींसाठी वेळ मिळत नाही, जे चुकीचे आहे. हे शरीराचे नुकसान करते. डॉक्टर पुढे म्हणतात की जोडप्यांना उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय शरीराच्या नैसर्गिक हार्मोनल चक्रात व्यत्यय आणते, ज्यामुळे प्रजनन आरोग्यावर देखील परिणाम होतो. यामुळे गर्भधारणेदरम्यान समस्या उद्भवू शकतात.

पुरेशी झोप न मिळणे

डॉक्टर असा निष्कर्ष काढतात की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप न घेणे. त्या स्पष्ट करकतात की, दररोज ७ ते ८ तासांची झोप केवळ एकूण आरोग्यासाठीच नाही तर प्रजननक्षमतेसाठी देखील आवश्यक आहे. जर तुम्ही गर्भधारणेचे नियोजन करत असाल तर या पाच गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. जर तुम्हाला अजूनही गर्भधारणा होण्यास त्रास होत असेल तर विलंब न करता तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य उपाय करून घ्या 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Pregnancy tips how to conceive baby and fix 5 habits otherwise pregnancy may become difficult for women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • lifestyle news
  • pregnancy
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

ताण घेतोय विद्यार्थ्यांचा बळी! दहावी–बारावीच्या परीक्षा जवळ; याकाळात थोडं समजून घ्या अन् पालकांनी अशी करा मुलांची मदत
1

ताण घेतोय विद्यार्थ्यांचा बळी! दहावी–बारावीच्या परीक्षा जवळ; याकाळात थोडं समजून घ्या अन् पालकांनी अशी करा मुलांची मदत

जिम नाही, डायट नाही! फक्त 30 मिनिटे डान्स करा आणि झपाट्याने वजन कमी करा; आजारांनाही ठेवेल दूर
2

जिम नाही, डायट नाही! फक्त 30 मिनिटे डान्स करा आणि झपाट्याने वजन कमी करा; आजारांनाही ठेवेल दूर

टॉयलेट सीटचं नाही तर घरातील या 6 जागा असतात सर्वाधिक अस्वच्छ, साफ न केल्यास वाढू शकते आजारांची भीती
3

टॉयलेट सीटचं नाही तर घरातील या 6 जागा असतात सर्वाधिक अस्वच्छ, साफ न केल्यास वाढू शकते आजारांची भीती

वाढत्या वयानुसार हँगओव्हरचा त्रास का वाढतो? संशोधनातून समोर आलं मूळ कारणं
4

वाढत्या वयानुसार हँगओव्हरचा त्रास का वाढतो? संशोधनातून समोर आलं मूळ कारणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.