
मूल होण्यासाठी आयुर्वेदिक उपाय (फोटो सौजन्य - iStock)
आयुर्वेदिक डॉक्टरांनी काही उपाय सांगितले जे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात, म्हणजेच पुरुषांची शक्ती आणि स्टॅमिना वाढविण्यास मदत करतात. याशिवाय डॉक्टरांनी महिलांच्या अंड्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपायदेखील सुचवले. चला जाणून घेऊया की हे उपाय काय आहेत आणि तज्ज्ञांनी काय सल्ला दिला आहे.
लग्नाला १० वर्षे झाली, पण तरीही गर्भधारणा होत नाही?
शुभंकर मिश्रा यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर सुभाष गोयल यांना विचारले की लग्नाच्या १० वर्षांनंतरही अनेक जोडप्यांना गर्भधारणा होत नसेल तर काय करावे. तज्ज्ञांनी या विषयावर पुरुष आणि महिलांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. या टिप्सचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्यास मदत मिळते असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. आयुर्वेदात प्रत्येक गोष्टीचा उपाय दडलेला आहे असं म्हटलं जातं. नक्की काय उपाय सुचविले आहेत, जाणून घ्या
काळी कौंच पावडर Sperm Count वाढविण्यास मदत करते
सुभाष गोयल स्पष्ट करतात की पुरुषांमध्ये फक्त १% शुक्राणूंची संख्या असली तरीही आयुर्वेद शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. ते काळ्या कौंचची अर्थात Mucuna pruriens ची पावडर बनवण्याचा सल्ला देतात. ज्या पुरुषांना Sperm Count कमी असल्याचा त्रास होत आहे त्यांनी ते वापरून पहावे असा सल्ला यावेळी डॉक्टरांनी दिला. इकतंच नाही तर हेच पुरुष स्टॅमिना वाढल्याने आपल्याला धन्यवादही देतील असंही ते यावेळी म्हणाले.
बाळाला जन्म देण्यासाठी पुरुषांचा Sperm Count किती पाहिजे, कशी करावी तपासणी
किती खावी पावडर?
डॉ. गोयल पुढे स्पष्ट करतात की काही पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या शून्य असते, परंतु त्यांच्यासाठी आयुर्वेदिक उपायदेखील आहेत. ते कौंचच्या बियांची पावडर बनवण्याचा सल्ला देतात, ज्याला कपी कच्छू असेही म्हणतात, आणि दररोज एक चमचा ते खाण्याचा सल्ला देतात. ही पावडर खाल्ल्याने पुरुषांना लवकरच चांगला गुण मिळू शकतो असा दावाही त्यांनी यावेळी आपल्या पॉडकास्टमध्ये केलाय.
महिलांनी तिळात काळा गूळ मिक्स करून खावा
तज्ज्ञ पुढे स्पष्ट करतात की अंडाशयातील समस्या किंवा कमी अंडी उत्पादन असलेल्या महिलांसाठी आयुर्वेदिक उपायदेखील प्रभावी आहेत. आपल्या रोजच्या राहण्यामुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेक महिलांना गर्भाशयातील अंड्याची समस्या निर्माण झालेली दिसून येते. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, महिलांना नियमित मासिक पाळी येण्यासाठी जुना काळा गूळ तिळात मिक्स करून खावा. यामुळे त्यांना व्यवस्थित फरक पडतो. मासिक पाळी नियमत येऊन बाळ होण्यासाठीही त्याचा फायदा होतो.
बाभळीच्या शेंगांची पावडर
सुभाष गोयल यांनी या पॉडकास्टमध्ये दिलखुलासपणे या महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली आहे. कौंच पावडरव्यतिरिक्त, बाभळीच्या शेंगाची पावडरदेखील अत्यंत फायदेशीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बरेचदा शुक्राणूंच्या कमतरतेमुळे पुरुष त्रासतात. पण अशा परिस्थितीत पुरुष स्टॅमिना आणि स्पर्म्स काऊंट वाढविण्यासाठी या दोन पावडरचा उपयोग करून पाहू शकतात असा सल्ला गोयल यांनी यावेळी दिला.
Bike चालवल्याने होणार नाही मूल? फर्टिलिटीवर काय होतो परिणाम, काय आहे तथ्य; जाणून घ्या
पहा व्हिडिओ
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.