गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का?
मानवी शरीरातील प्रत्येक अवयव निरोगी जीवन जगण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. त्यातील महिलांच्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे गर्भाशय. दैनंदिन आयुष्य जगताना महिलांना अनेक मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी मासिक पाळीतील वेदना तर कधी कुटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादी अनेक गोष्टींमुळे महिला शारीरिक दृष्ट्या कमकुवत होऊन जातात. त्यामुळे गर्भाशयात गाठी होणे, पीसीओडी,पीसीओएस, गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयाचा विस्तार, अनियमित किंवा जास्त रक्तस्त्राव, गर्भाशयाचा कॅन्सर इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. या समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात सुरुवातीच्या दिवसांमध्ये सामान्य लक्षणे दिसू लागतात. मात्र अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात.(फोटो सौजन्य – iStock)
महिलांच्या शरीरात वयाच्या प्रत्येक टप्प्यात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांकडे लक्ष न दिल्यामुळे महिलांना पुढे जाऊन अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. गर्भाशयासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेकदा गर्भाशय काढण्याचा सल्ला डॉक्टर देतात. गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेला हिस्टेरेक्टॉमी असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरीराचे शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडते. याशिवाय हार्मोनचे संतुलन बिघडल्यामुळे अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्जरीनंतर महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. जाणून घेऊया सविस्तर.
गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळीचे चक्र पूर्णपणे थांबते, ज्यामुळे मासिक पाळी येत नाही. गर्भाशयाचे एंडोमेट्रियम बाहेर पडते तेव्हा मासिक पाळी येते. मात्र गर्भाशय काढून टाकल्यानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे थांबते. यामुळे महिलांना मासिक पाळी येत नाही. अचानकपणे मासिक पाळी बंद झाल्यानंतर शरीरात काहीसे बदल होऊ लागतात.
शरीरात सतत थकवा जाणवतो? विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
टोटल हिस्टेरेक्टॉमी ही सर्जरी करून महिलांच्या शरीरातील गर्भाशय पूर्णपणे काढून टाकले जाते. यामुळे महिलांची मासिक पाळी थांबते. याशिवाय सबटोटल किंवा पार्टियल हिस्टेरेक्टॉमी सर्जरी केल्यानंतर गर्भाशयाचा वरचा भाग काढून टाकला जातो. या प्रक्रियेमध्ये गर्भाशयाची ग्रीवा ठेवली जाते. यामुळे महिलांच्या शरीरातील हार्मोनचे संतुलन होते आणि काहीवेळा नॉर्मल रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. अनेकदा हिस्टेरेक्टॉमीनंतर महिलांना रक्तस्त्राव होण्याची किंवा सपोर्टिंग होते. मात्र शरीरात कोणतीही गंभीर लक्षणे किंवा जास्त रक्तस्त्राव होण्यास सुरुवात झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.