Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरुषांनो! तुमच्या आरोग्याबद्दल बोलणं लाजिरवाणं नाही, वाढत्या Prostate Cancer विषयी जाणून घ्या

प्रोस्टेट कॅन्सर वाढताना दिसून येत आहे. मात्र याविषयी अजूनही पुरुषांमध्ये जागरुकता नाही. याविषयी बोलताना पुरुष लाजत आहेत. यामध्ये कोणतीही लाजिरवाणी गोष्ट नाही, याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 26, 2025 | 06:13 PM
प्रोस्टेट कॅन्सरबाबत जागरूकता महत्त्वाची (फोटो सौजन्य - iStock)

प्रोस्टेट कॅन्सरबाबत जागरूकता महत्त्वाची (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रोस्टेट कॅन्सर जागरूकता महिना
  • पुरुषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर 
  • जास्तीत जास्त जागरुकतेची गरज का?
पुरुष सहसा त्यांच्या प्रोस्टेट आरोग्याबद्दल बोलताना लाजतात किंवा अस्वस्थ होतात. अनेक पुरुष याबद्दल बोलणे टाळतात आणि शांतपणे त्रास सहन करतात. सांस्कृतिक कलंक, गैरसमज, लाज, जागरूकतेचा अभाव आणि मूत्रविषयक किंवा लैंगिक समस्यांबद्दल चर्चा करण्यास असलेली संकोच यामुळे प्रोस्टेट कॅन्सरच निदान उशिरा होतं. 

वेळीच आजाराचे निदान झाल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात. डॉ. संजय धनगर, युरोलॉजिस्ट, लेसर, रोबोटिक आणि रिकन्स्ट्रक्शन स्पेशालिस्ट युरोसर्जन अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, पुणे यांनी Prostate Cancer जागरूकता महिन्यात याविषयी गंभीरपणे भाष्य केले आहे आणि या आजाराविषयी पुरुषांनी व्यक्त होण्याचे आवाहनही केले आहे. 

पुरूषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या Prostate Cancer ची सुरूवातीची 5 लक्षणे, वेळीच ओळखा

प्रोस्टेट म्हणजे काय?

प्रोस्टेट ही पुरुषांच्या शरीरातील मूत्राशयाच्या खाली असलेली एक लहान ग्रंथी आहे. ही ग्रंथी वीर्यातील द्रव तयार करते, जो प्रजननासाठी महत्त्वाचा असतो. प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे या ग्रंथीतील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा होणारा आजार. हा कॅन्सर प्रामुख्याने ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये आढळतो, पण आता ३५ ते ४५ वर्षांच्या पुरुषांमध्येही दिसू लागला आहे. या आजाराचे नेमके कारण माहीत नाही, पण वय वाढणे, कुटुंबात अशा आजाराचा इतिहास असणे, वजन जास्त असणे आणि जास्त तेलकट-चरबीयुक्त अन्न खाणे यामुळे धोका वाढतो. हार्मोन्समधील बदल किंवा प्रोस्टेटला होणारी दीर्घकालीन सूज देखील यासाठी कारणीभूत ठरू शकते.

प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे:

  • वारंवार लघवी लागणे, विशेषतः रात्री लघवीचा प्रवाह कमी होणे  
  • लघवी सुरू किंवा थांबवताना त्रास होणे  
  • वीर्य स्खलनाच्या वेळी वेदना होणे
  • लघवी किंवा वीर्यात रक्त दिसणे
  • पाठ किंवा श्रोणी (कमरेखालील भाग) मध्ये सतत दुखणे
पुरुष याबद्दल बोलणे का टाळतात?

भारतात अनेक पुरुष प्रोस्टेट किंवा लैंगिक आरोग्याविषयी बोलायला लाजतात. यामागे दोन मोठी कारणं आहेत. लाज आणि माहितीचा अभाव हे आहे. अनेक पुरुषांना वाटतं की लघवीच्या समस्या वयानं येतात, त्यामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात. काहींना या विषयावर बोलताना अस्वस्थ वाटतं, तर काहींना वाटतं की लोक काय म्हणतील. या भीतीमुळे आणि गप्प राहण्यामुळे आजाराचे वेळीच निदान होत नाही. त्यामुळे उपचार कठीण होतात आणि जीवाला धोका वाढतो.

जीवनशैली बदल ठरतोय प्रोस्टेट कर्करोगासाठी कारणीभूत – कर्करोग तज्ज्ञांचा इशारा

प्रोस्टेट कॅन्सरचे निदान 

डॉक्टर सहसा PSA रक्त तपासणी आणि डिजिटल रेक्टल तपासणी करण्याचा सल्ला देतात. या दोन्ही सोप्या आणि वेदनारहित चाचण्या आहेत. या तपासण्यांमुळे प्रोस्टेट कॅन्सर लवकर ओळखता येतो, आणि वेळेवर उपचार केल्यास रुग्णाचं आयुष्य वाढू शकतं. म्हणून ५० वर्षांनंतर या तपासण्या नियमितपणे करणे महत्त्वाचे आहे. जर कॅन्सरचे निदान झाले, तर डॉक्टर रुग्णाच्या अवस्थेनुसार योग्य उपचार योजना ठरवतात.

या कॅन्सरचे व्यवस्थापन हे त्याच्या टप्प्यानुसार केले जाते आणि त्यात शस्त्रक्रिया, किरणोत्सार उपचार, हार्मोन थेरपी किंवा औषधोपचारांचा समावेश असू शकतो. फळे, भाज्या आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडयुक्त संतुलित आहार, प्रक्रिया केलेल्या अन्नाचा त्याग, नियमित व्यायाम आणि धूम्रपान टाळणे या उपायांनी या कॅन्सरपासून बचाव करता येतो. आता वेळ आली आहे की पुरुषांनी त्यांच्या प्रोस्टेट आरोग्याबद्दल खुल्या मनाने बोलले पाहिजे. जेणेकरून आजाराचे वेळीच निदान होऊ शकेल.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Prostate cancer awareness month men should talk about it to get good health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 06:13 PM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness
  • Prostate Cancer symptoms

संबंधित बातम्या

Gastric Cancer: धूम्रपानामुळे वाढतो पोटाच्या कर्करोगाचा धोका, कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स
1

Gastric Cancer: धूम्रपानामुळे वाढतो पोटाच्या कर्करोगाचा धोका, कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स

”रोज नवीन वेदना”.. दीपिका कक्कर कॅन्सरच्या उपचारांमुळे भावूक, म्हणाली, ”मनात भीती…”
2

”रोज नवीन वेदना”.. दीपिका कक्कर कॅन्सरच्या उपचारांमुळे भावूक, म्हणाली, ”मनात भीती…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.