Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ragi Chapati Recipe : हाडे मजबूत करेल, पचनक्रियाही सुधारेल प्रोटीनयुक्त ‘नाचणीची चपाती’, रेसिपी नोट करा

Healthy Recipe : जुन्या काळात आहारात नाचणीचा आवर्जून समावेश केला जायचा पण आजकाल अनेकजण नाचणीला आहारातून वगळत आहेत. यातील पोषक घटक शरीराला अनेक फायदे मिळवून देतात. याची चपाती बनवून तुम्ही खाऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 16, 2025 | 09:33 AM
Ragi Chapati Recipe : हाडे मजबूत करेल, पचनक्रियाही सुधारेल प्रोटीनयुक्त 'नाचणीची चपाती', रेसिपी नोट करा

Ragi Chapati Recipe : हाडे मजबूत करेल, पचनक्रियाही सुधारेल प्रोटीनयुक्त 'नाचणीची चपाती', रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • रोजच्या आहारात नाचणीचा समावेश फायद्याचा ठरतो
  • तुम्ही नाचणीची चपाती तयार करून त्याला आहारात समाविष्ट करू शकता
  • ही चपाती चवीला छान लागते आणि सर्व भाज्यांसोबत खाल्ली जाते
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण पुन्हा एकदा पारंपरिक आणि नैसर्गिक आहाराकडे वळण्याची गरज आहे. आपल्या आजी–आजोबांच्या स्वयंपाकघरात वापरली जाणारी धान्ये केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक होती. त्यापैकीच एक महत्त्वाचे आणि गुणकारी धान्य म्हणजे रागी (नाचणी). नाचणीपासून तयार केली जाणारी रागी चपाती ही दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. ग्रामीण भागात नाचणीची चपाती ही रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग होती.

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा लहान मुलांच्या आवडीचा Cheese White Sauce Pasta, नोट करून घ्या रेसिपी

नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, फायबर आणि प्रोटीन असते. त्यामुळे हाडे मजबूत राहतात, पचनक्रिया सुधारते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी नाचणी फार उपयुक्त मानली जाते, कारण ती रक्तातील साखर हळूहळू वाढवते. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठीही नाचणीची चपाती हा उत्तम पर्याय आहे. नाचणीची चपाती बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असली तरी योग्य पद्धतीने केली तर ती मऊ, चवदार आणि पोटभरू होते. उसळ, पिठलं, वरण किंवा लोणच्यासोबत नाचणीच्या चपातीची चव खास लागते. चला तर मग, घरच्या घरी पौष्टिक नाचणीची चपाती कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.

 साहित्य

  • रागी पीठ (नाचणी पीठ) – 2 वाट्या
  • मीठ – चवीनुसार
  • गरम पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल किंवा तूप – थोडेसे (भाजण्यासाठी)
जेवणात तोंडी लावण्यासाठी हिरव्यागार ताज्या मिरच्यांपासून बनवा इन्स्टंट चटपटीत लोणचं, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

 कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका परातीत नाचणीचे पीठ घ्या. त्यात मीठ घाला.
  • आता हळूहळू गरम पाणी घालून चमच्याने किंवा हाताने मऊ पीठ मळा. रागी पीठ थोडे चिकट असते, त्यामुळे घट्टसर पीठ मळून घ्या.
  • मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या.
  • हे गोळे पिठात मिसळून पोळपाटावर गोळ्याची जाडसर चपाती लाटून घ्या.
  • पीठ जास्त वापर म्हणजे चपाती चिकटणार नाही.
  • आता जाड तवा मध्यम आचेवर गरम करा. तवा नीट गरम झाला की त्यावर लाटलेली नाचणीची चपाती सावकाश टाका.
  • एका बाजूने भाजल्यानंतर चपाती उलटी करा. दोन्ही बाजूंनी छान शिजेपर्यंत भाजा.
  • चपाती भाजताना कडांना थोडे तेल किंवा तूप सोडा. त्यामुळे चपाती मऊ आणि चवदार होते.
  • गरमागरम नाचणीची चपाती भाज्यांची उसळ, पिठलं, आमटी, दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.
  • नाचणीची चपाती ताजी असतानाच खावी, कारण थंड झाल्यावर ती कडक होते.
  • मऊ भाकरीसाठी गरम पाणी वापरणे फार महत्त्वाचे आहे.

Web Title: Protein rich how to make ragi chapati at home note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 09:33 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • healthy food
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत
1

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
3

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
4

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.