जेवणात तोंडी लावण्यासाठी हिरव्यागार ताज्या मिरच्यांपासून बनवा इन्स्टंट चटपटीत लोणचं
सकाळ संध्याकाळच्या जेवणात प्रत्येकाला काहींना काही चटपटीत खाण्यास हवे असते. चटपटीत आणि झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर घरी मसालेदार पदार्थ बनवले जातात. पण कायमच मसालेदार पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरते. त्यामुळे नेहमीच कमीत कमी तिखट आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. वाढत्या थंडीत चटपटीत आणि तिखट पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही हिरव्यागार मिरच्यांपासून झणझणीत लोणचं बनवू शकता. हिरव्या मिरचीचं लोणचं जेवणात तोंडी लावण्यासोबतच गरमागरम भाकरी, चपाती किंवा पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकता. कमीत कमी वेळात झटपट तयार होणारे मिरचीचे लोणचं दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहते. बऱ्याचदा लोणचं तयार केल्यानंतर ते महिनाभर मुरण्याची वाट पाहावी लागते. पण हिरव्या मिरचीचे लोणचं लगेच मुरते. चला तर जाणून घेऊया हिरव्या मिरचीचे लोणचं बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)






