संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा लहान मुलांच्या आवडीचा Cheese White Sauce Pasta
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप जास्त आवडतो. बाहेर फिरायला गेल्यानंतर सगळ्यात आधी मुलांना पिझ्झा, फ्राईज आणि पास्त्याची आठवण येते. पण कायमच विकतचा पास्ता खाण्यापेक्षा घरी बनवलेला पास्ता खावा. बाजारात कायमच प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ विकले जातात. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच घरी बनवलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चीज व्हाईट सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पास्ता हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर सुद्धा खाऊ शकता. पास्ता बनवताना त्यात वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या टाकाव्यात. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि लहान मुलांच्या शरीराला पोषण मिळते. बऱ्याचदा घरी पास्ता बनवल्यानंतर त्यात गुठळ्या होतात. चला तर जाणून घेऊया चीज व्हाईट सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)






