Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात हाहाःकार! धोका वाढला; GBS च्या रुग्णात वाढ, 73 जणांना बाधा तर 14 जण वेंटिलेटरवर

तुम्ही गिलियन बॅरे सिंड्रोमबद्दल क्वचितच ऐकले असेल, परंतु आता हा आजार पुण्यात पसरतोय. त्यामुळे सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. चला त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नक्की काय आहे कारण

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 25, 2025 | 02:06 PM
गिलियन बॅरे सिंड्रोमच्या रूग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ

गिलियन बॅरे सिंड्रोमच्या रूग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल अशा आजारांचा धोका वाढत आहे ज्यांचे नाव सामान्य लोकांनीही ऐकले नसेल. महाराष्ट्रातील प्रमुख शहर पुणे येथे गिलियन बॅरे सिंड्रोम ज्याला काही ठिकाणी गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) असेही म्हटलं जात आहे, या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे सहा नवीन संशयित रुग्ण आढळले आहेत. या प्रदेशातील एकूण रुग्णांची संख्या आता ७३ वर पोहोचली असून सध्या या रोगाने पुण्यात हाहाःकार माजवला असल्याचे दिसून येत आहे. 

इतकंच नाही तर का पर्यंत वेंटिलेटवर असणाऱ्या रुग्णांची संख्या १२ होती जी आज १४ वर पोहचली असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

किती गंभीर परिस्थिती?

“जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या ७३ झाली आहे, ज्यामध्ये ४७ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश आहे. यापैकी १४ जण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत,” असे वृत्तसंस्था पीटीआयने राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले आहे. दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला २४ संशयित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याची चौकशी करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले ​​आहेत आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) स्थापन केली आहे, जेणेकरून या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवता येईल. 

जीवघेण्या GBS मुळे पुण्यात 59 लोक रुग्णालयात तर 12 वेंटिलेटरवर; शौचातून निघाला बॅक्टेरिया, योग्य पद्धतीने खा चिकन-मटण

WHO ने सांगितले आजाराबाबत 

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोम ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय मज्जासंस्थेच्या एका भागावर हल्ला करते. या सिंड्रोममध्ये, स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या आणि वेदना, तापमान आणि स्पर्श संवेदना वाहणाऱ्या नसा प्रभावित होतात, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, पाय आणि/किंवा हातांमध्ये संवेदना कमी होतात आणि गिळताना किंवा श्वास घेण्यास त्रास होतो

महामारी आहे का?

ही एक दुर्मिळ स्थिती आहे आणि जरी ती प्रौढ आणि पुरुषांमध्ये अधिक सामान्य असली तरी, सर्व वयोगटातील लोकांना याचा त्रास होऊ शकतो. अधिकाऱ्यांनी जनतेला माहिती दिली आहे की गुइलेन-बॅरे सिंड्रोम धोकादायक आहे, परंतु त्यामुळे महामारी किंवा जागतिक साथीचा रोग होऊ शकत नाही. हा आजार वेळीच उपाय करून बरा करता येतो. मात्र त्यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे आणि योग्य ती यंत्रणा असणेही गरजेचे आहे 

कसे मिळू शकते नियंत्रण

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) पुणे महानगरपालिका आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने बाधित भागांवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी आतापर्यंत शहर आणि त्याच्या ग्रामीण जिल्ह्यांमधील ७,२०० हून अधिक घरांचे सर्वेक्षण केले आहे. पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका आणि ग्रामीण जिल्ह्यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सर्वेक्षणाचे प्रयत्न केले गेले आहेत. आतापर्यंत, पीएमसी हद्दीतील १,९४३ घरे, चिंचवडमधील १,७५० घरे आणि ग्रामीण भागातील ३,५२२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

हातपाय पडतील निळे शरीराचाही होईल सांगाडा; शाकाहारी खाणाऱ्यांना अधिक धोका, Vitamin B12 युक्त 5 पदार्थ खायलाच हवेत

काय करणे गरजेचे 

तुम्ही चिकन वा मटण खात असाल तर ते संपूर्ण शिजवून खाणे गरजेचे आहे. कारण चिकन – मटण योग्य पद्धतीने शिजले नसेल तर शौचातून हा आजार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या पुण्यातील लोकांनी चिकन आणि मटण खाणे वर्ज्य करणे अधिक हिताचे ठरू शकते. तसंच हातापायाला मुंग्या येणे, पोटातून कळ येऊन उलट्या वा जुलाब होणे आणि मळमळसारखे वाटणे अशी लक्षणं दिसत असतील असतील तर त्वरीत डॉक्टरांना भेट द्या

Web Title: Pune recorded 73 cases of gbs rare neurological disorder called guillain barre syndrome 12 on ventilators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • Guillain Barre syndrome
  • Health News
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला
2

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
3

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
4

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.