Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनेकांची घरे उद्धवस्त केली, आंदेकर कुटुंबीयाना उमेदवारी देऊ नका; आयुषच्या आईची अजित पवारांना विनंती

आंदेकर कुटुंबीयांना अजित पवार यांनी उमेदवारी देऊ नये, अशी विनंती करणार आहे’, असे कल्याणी कोमकर हिने म्हंटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 29, 2025 | 12:51 PM
अनेकांची घरे उद्धवस्त केली, आंदेकर कुटुंबीयाना उमेदवारी देऊ नका; आयुषच्या आईची अजित पवारांना विनंती

अनेकांची घरे उद्धवस्त केली, आंदेकर कुटुंबीयाना उमेदवारी देऊ नका; आयुषच्या आईची अजित पवारांना विनंती

Follow Us
Close
Follow Us:
  • अनेकांची घरे उद्धवस्त केली
  • आंदेकर कुटुंबीयाना उमेदवारी देऊ नका
  • आयुषच्या आईची अजित पवारांना विनंती
पुणे : बंडू आंदेकर दोरखंडात उमेदवारी भरायला आला खरा पण त्याचा अर्धवट अर्ज असल्याने तो स्विकारला गेला नाही. ही बंडू आंदेकरची चाल असल्याचेही म्हंटले जात असतानाच आता त्याची मुलगी व आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर हिने ‘आंदेकर कुटुंबीयांना न्यायालयाने निवडणूक लढविण्यास परवानगी द्यायला नको होती. बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीने अनेकांची घरे उद्धवस्त केली आहेत. आंदेकर कुटुंबीयांना अजित पवार यांनी उमेदवारी देऊ नये, अशी विनंती करणार आहे’, असे तिने म्हंटले आहे.

कल्याणी कोमकर हिने रविवारी पत्रकारांशी बोलताना ही मागणी केली आहे. आयुष कोमकर खून प्रकरणात म्होरक्या बंडू आंदेकरसह १५ जणांना अटक केली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खूनात आयुषचे वडील गणेश कोमकर याला अटक झाली. नंतर वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला म्हणून आयुषनंतर कोंढव्यात गणेश काळे याचा खून झाला.

दरम्यान, सातत्याने निवडणूक लढवून आंदेकर कुटूंबातून दोघे नगरसेवक होतात. यंदा मात्र, कुटूंबच कारागृहात आहे. त्यामुळे ते निवडणूक लढवणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु, आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांना विशेष न्यायालयाने महापालिका निवडणूक लढविण्यास परवानगी दिली. त्यानंतर बंडू आंदेकरसह भावजय व सून सोनाली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु, यातही उमेदवारी अर्ज अधर्वट असल्याने ते स्विकारले गेले नाही. त्यामुळे ते पुन्हा उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी दाखल होणार असल्याचे समजते.

त्यात आता कल्याणी कोमकर पत्रकारांशी बोलताना म्हणाली, ‘आंदेकर कुटुंबीयांना न्यायालयाने निवडणूक लढविण्यास परवानगी दिली आहे. लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार) उमेदवारी देण्याचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आंदेकरांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देऊ नये, अशी विनंती मी अजित पवार यांच्याकडे करणार आहे.

बंडू आंदेकरला घोषणाबाजी न करता उमेदवाजी अर्ज दाखल करण्यास न्यायालायने परवानगी दिली होती. आंदेकरने घोषणाबाजी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या विरोधात मी न्यायालयात दाद मागणार आहे. आंदेकर यांनी मुद्दामाहून अर्ज चुकविला. आंदेकर यांना काही राजकीय पक्षाचे नेते मदत करत आहेत. त्यांना उमेदवारी देणाऱ्या पक्षाच्या निषेधार्थ मी आंदोलन करणार आहे. वनराज आंदेकर माझा भाऊ होता. मी माझ्या भावाची सुपारी देऊन खून घडवून आणला, असा आरोप करण्यात आला. याप्रकरणाशी आमचा संबंध नाही. माझ्या मुलाचा खून आंदेकर टोळीने केला. आंदेकर टोळीने विजय निंबाळकर, निखील आखाडे, आयुष कोमकर, गणेश काळे यांचे खून केले’, असे तिने सांगितले.

Web Title: Ayush komkars mother has requested deputy chief minister ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Vanraj Andekar

संबंधित बातम्या

Pune Election : पुण्यात महाविकास आघाडीत बिघाडी? मत्वाच्या बैठकीला शरद पवार गटाची दांडी
1

Pune Election : पुण्यात महाविकास आघाडीत बिघाडी? मत्वाच्या बैठकीला शरद पवार गटाची दांडी

Pune Election : ए बी फॉर्म हॉटेलमध्ये की कार्यालयात देणार? उमेदवारांसह पक्षप्रमुखांची लागणार कसोटी
2

Pune Election : ए बी फॉर्म हॉटेलमध्ये की कार्यालयात देणार? उमेदवारांसह पक्षप्रमुखांची लागणार कसोटी

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
3

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन
4

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.