पंजाबी स्वादाने भरलेला मऊ आणि कुरकुरीत कुलचा; अगदी हॉटेलसारखी चव आता तुमच्या घरी कुलचा रेसिपी
पंजाबी कुलचा हा उत्तर भारतातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय प्रकारचा ब्रेड आहे, जो प्रामुख्याने अमृतसर, पंजाब येथे खूपच प्रसिद्ध आहे. कुलचा बहुधा छोले किंवा कोणत्याही पंजाबी सब्जीबरोबर सर्व्ह केला जातो. कुलच्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची हलकी साखरसर चव, मऊपणा आणि कुरकुरीत पोत. हा नानसारखा दिसतो, परंतु तो तवा किंवा ओव्हनवर भाजला जातो व त्यावर लोणी किंवा बटर लावले जाते.
विकेंड बनवा खास, घरी मुघलाई जेवणाचा थाट! व्हेज लव्हर्ससाठी खास Mughlai Paneer Recipe
अनेकदा हॉटेलमध्ये किंवा कोणत्या धाब्यावर गेल्यावर कुलचा आवर्जून मागवला जातो. बटर लावून भाजलेला हा मऊदार कुलचा कोणत्याही भाजीसह लज्जतदार लागतो. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याच्या प्रेमात पाडते. यासहच याची रेसिपीही फार सोपी, सहज आणि झटपट तयार होणारी आहे. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ एकदा घरी नक्की बनवून पहा. चला नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
काहीतरी नवीन ट्राय करा; घरी बनवा कोरियन स्टाईल टेस्टी Cheese Corn Dog
कृती