
इडली डोसासोबत खाण्यासाठी झटपट घरी बनवा उडपी हॉटेल स्टाईल खोबऱ्याची चटणी
जगभरातील सर्वच देशांमध्ये दक्षिण भारतीय पदार्थ खूप फेमस आहे. तिथे बनवला जाणारा प्रत्येक पदार्थ तांदूळ आणि उडीद डाळ, ओल खोबर इत्यादी पदार्थांचा वापर करून बनवला जातो. हटके चवीचे साऊथ इंडियन पदार्थ खाल्ल्यानंतर पोट भरते आणि मनाला सुद्धा समाधान वाटते. बऱ्याचदा इडली, डोसा बनवल्यानंतर ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली जाते. पण चटणीची चव उडपी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चटणीसारखी लागत नाही. बऱ्याचदा इडली बनवल्यानंतर बाहेरून विकतची चटणी आणली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उडपी हॉटेल स्टाईल खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये झटपट तयार होतो. याशिवाय अस्सल साऊथ इंडियन पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. याशिवाय खोबऱ्याची चटणी तुम्ही इतर कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. पराठा किंवा चपातीसोबत सुद्धा खाल्ली जाते. चला तर जाणून घेऊया उडपी स्टाईल खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
कमी तेलाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया कटलेट, नोट करून घ्या झटपट रेसिपी