जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबट गोड चवीची चिंच चटणी
थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत आणि झणझणीत पदार्थ खाण्यास हवे असतात. कितीही चविष्ट भाजी बनवल्यानंतर सुद्धा चटणी किंवा लोणचं लागतच. याशिवाय घरातील प्रत्येक पदार्थ आंबटगोड चवीने भरलेला असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट चिंच चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. प्रत्येक स्वयंपाक घरात चिंच उपलब्ध असतात. जेवणातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी चिंचेचा वापर केला जातो. चिंच चटणी आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते. पुरणपोळी, भाजी-भाकरी, वरण-भात किंवा साध्या पोळीसोबत सुद्धा चिंच चटणी खाऊ शकता. बऱ्याचदा घरात पाणीपुरी बनवल्यानंतर गोड पाणी बाहेरून विकत आणले जाते. पण विकतचे पाणी आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही चिंच चटणी बनवू शकता. कमीत कमी साहित्यात बनवलेली चिंच चटणी घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया चिंच चटणी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
रविवार होईल आणखीनच स्पेशल! रात्रीच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत मालवणी चिकन सुक्का






