कमी तेलाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया कटलेट
सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणातील पदार्थांमध्ये प्रत्येकाला कमीत कमी तेलाचा वापर करून बनवलेले पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. तेलाच्या अतिवापरामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. जेवणात अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुरुवात होते. रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅक आणि हृदयरोगाचे कारण ठरते. त्यामुळे नाश्त्यात कमीत तेलाचा वापर करून बनवलेले पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हाय प्रोटीन सोया कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत अतिशय सुंदर लागतो. सोयाबीन खाणे शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेल्या प्रोटीन आणि कॅल्शियममुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. शाहाकारी लोकांसाठी सोयाबीन खाणे उत्तम पर्याय आहे. सोयाबीन चवीसोबत आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया सोया कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)






