Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानमध्ये लपलंय हिरवळीने भरलेलं ठिकाण, 100 आयलँडच्या नावाने प्रचलित

Travel News : राजस्थानात एक असे निसर्गरम्य ठिकाण आहे, जे शांत वातावरण, हिरवाई आणि पाण्याच्या अप्रतिम दृष्यांसाठी ओळखले जाते. गर्दीपासून दूर शहराच्या गजबटापासून शांत आणि कमी गर्दीच्या ठिकाणाला भेट द्यायची अ

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 01, 2026 | 08:04 AM
राजस्थानमध्ये लपलंय हिरवळीने भरलेलं ठिकाण, 100 आयलँडच्या नावाने प्रचलित

राजस्थानमध्ये लपलंय हिरवळीने भरलेलं ठिकाण, 100 आयलँडच्या नावाने प्रचलित

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात हिरवाईने नटलेले निसर्गरम्य वातावरण आणि शांत परिसर पर्यटकांना आकर्षित करतो.
  • बोटींग, फोटोग्राफी, व्लॉगिंग आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण खास मानले जाते.
  • प्रवासापूर्वी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आधीच करून जाणे अधिक सोयीचे ठरते.
राजस्थानात ‘चाचा कोटा’ नावाचे एक खूप सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणाला १०० आयलँडचे शहर या नावानेही ओळखले जाते. खरंतर इथे लहान-मोठे असंख्य बेट आहेत ज्यामुळे चारही बाजूने हे ठिकाण पाणी आणि हिरवळीने बहरलेले दिसते. इथे फक्त शांततामय वातावरणच नाही तर निसर्गाच्या सानिध्यात मोकळा वेळ घालवता येतो. याशिवाय इथे तुम्ही बोटींग, घोडेस्वारी, फोटोग्राफी अशा अनेक उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकता.

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

माउंट आबू हे राजस्थानमधील एक खूप लोकप्रिय असे हिल स्टेशन आहे. परंतु चाचा कोटा हे इथले एक सुंदर हिडन डेस्टीनेशन आहे. अनेकांना या ठिकाणाची फारशी माहिती नाही ज्यामुळे पर्यटकांची इथे कमी गर्दी पाहायला मिळते. पावसाळ्यात या ठिकाणाला भेट देणं एक चांगला पर्याय ठरु शकतं, कारण याकाळात इथे हिरवळीने संपूर्ण परिसर बहरलेला असतो. चला तर मग या ठिकाणाची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊया.

हिरवळीने भरलेले बेट

चाचा कोटा हे बांसवाडा शहरापासून १४ ते १५ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. माही नदीच्या काठावर वसलेल्या या ठिकाणी अनेक लहान बेटे पाहता येतात. इथून चारही दिशेने तुम्हाला फक्त पाणी आणि बेटांची हिरवळ पाहायला मिळेल. बॅकवॉटर एक्टीव्हिटीजचे शाैकीन असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी कोणत्या स्वर्गाहून कमी नाही. शहराच्या गडबटापासून दूर एका शांत ठिकाणी वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. इथे पोहचल्यावर असे वाटते जणू आपण एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर किंवा थंड हवेच्या ठिकाणी आलो आहोत.

अनेक उपक्रमांमध्ये घ्या भाग

सोलो ट्रॅव्हलिंग करण्यासाठी किंवा कुटुंबासोबत मोकळा वेळ घालवण्यासाठी चाचा कोटा एक चांगला पर्याय ठरु शकते. चारही बाजूने हिरवळ आणि पाणी असल्याकारणाने फोटोग्राफी आणि व्लाॅगिंकसाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय ठरेल. इथे तुम्ही बोटींगचा आनंद लुटु शकता ज्यासाठी साधारण ५० ते १०० रुपयांपर्यंतचा खर्च लागू शकतो. पावसाळ्यात इथे तुम्हाला धबधबे आणि सूर्यास्ताच्या सुंदर दृष्यांचाही अनुभव घेता येईल.

कस पोहचायचं?

इथे जाण्यासाठी प्रथम तुम्हाला बासवाडा शहरात पोहचावं लागेल. बांसवाडाला जाण्यासाठी थेट रेल्वे नाहीत ज्यामुळे तुम्हाला सर्वात आधी बासवाडाच्या जवळचे रेल्वे स्थानक रतलाम जंक्शन इथे पोहचावं लागेल. इथून तुम्ही टॅक्सी करुन बांसवाडाला पोहचू शकता.

मसुरी ट्रिपमध्ये ‘झरीपानी कॅसल’ला नक्की भेट द्या; यालाच म्हणतात खरं ‘मुसाफिर कॅफे’

या गोष्टी ध्यानात ठेवा?

चाचा कोटामध्ये कमर्शियल हाॅटेल्स नाही आहेत. इथे मोठे रेस्टाॅरंट्सदेखील उपलब्ध नाहीत. यामुळेच जर तुम्ही या ठिकाणाला भेट द्यायला जात असाल तर आपल्यासोबत जेवण-पाणी घेऊन प्रवासाला सुरुवात करा.

 

Web Title: Rajasthan hidden monsoon destination chacha kota travel guide 100 islands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 08:04 AM

Topics:  

  • rajasthan
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
1

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
2

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.