
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठी शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ देऊळगावमध्ये 12 जानेवारी 1598 रोजी झाला. राजमाता जिजाऊ यांनी खडतर परिस्थितीवर मात करत स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. जिजाऊ यांनी स्वराज निर्माण करण्यासाठी शिवरायांच्या मनात प्रचंड मोठा आत्मविश्वास निर्माण केला जातो. त्यांच्या प्रयत्नांमुळे हिंदवी स्वराजाची स्थापना झाली. संपूर्ण देशभरात सगळीकडे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. शाळा, कॉलेजमध्ये भाषण आणि वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून १२ जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तुमचे मित्र, सहकारी आणि नातेवाईकांना शुभेच्छा देऊ शकता.(फोटो सौजन्य – pinterest)
जिजाई तुझ्या स्वप्नाला, तू हिमतीचे अन संस्काराचे बळ दिले! तुझ्या आशीर्वादानेच, शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले! राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
रचली स्वराज्याची गाथा, दैवत असे ती राजमाता…. राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता… राजमाता जिजाबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मुजरा माझा माता जिजाऊंना, जिने घडविले शुर शिवबाला… साक्षात होती ती आई भवानी, जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी! राजमाता जिजाऊ यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
अखंड स्वातंत्र्याची प्रेरणा, राजमाता जिजाऊ माँसाहेबांना जयंतीदिनी त्रिवार मुजरा! राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
जिजाऊंच्या विचारांची मशाल आपल्या मनात सदैव तेवत ठेवून स्वराज्याची सेवा करूया.
साक्षात आदिशक्तीचे रूप, राजमाता जिजाऊ साहेब यांना जयंतीनिमित्त वंदन!
जिजाऊ तुम्ही नसता, तर दिसले नसते हे स्वराज्य… तुम्हाला कोटी कोटी प्रणाम!
स्त्री शक्तीचा आदर्श, राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जिजाऊ आऊसाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीला आणि त्यांना माझा मुजरा!
शिवबांची माता, स्वराज्याची विधाता… राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा!
तुमच्या संस्कारांमुळेच आज आम्ही मानाने जगतोय, आई जिजाऊंना विनम्र अभिवादन!
तेजस्वी सूर्य आणि शीतल चंद्र जसे आकाशात, तसेच जिजाऊंचे विचार आमच्या मनात!
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू, जिजाऊ माऊलींच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
पराक्रम आणि बुद्धिमत्तेचा संगम म्हणजे राजमाता जिजाऊ… अभिवादन!
शिवरायांच्या यशाचे गुपित म्हणजे जिजाऊंचे संस्कार… जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणाऱ्या माँ जिजाऊंना त्रिवार मुजरा!
जिजाऊंचे विचार हीच आपली खरी संपत्ती… जयंतीनिमित्त शुभेच्छा!
रयतेची आई, जिजाऊ माऊली… तुम्हाला मानाचा मुजरा आणि शुभेच्छा!
शिव-शंभूंच्या प्रेरणेला माझा मानाचा मुजरा… जय जिजाऊ, जय शिवराय!
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताड्यावर केला प्रहार
त्या थोर राजमाता जिजाऊला मानाचा मुजराराजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन…
जिजाऊ यांची गौरव गाथा
त्यांच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
जय भवानी… जय शिवाजी… जय जिजाऊ
स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता
धन्य त्या स्वराज्य जननी जिजामातेला
राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणार्या राजमाता जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा
ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्य ज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमित्त अभिवादन
आपण नसता तर नसते झाले
शिवराय आणि शंभू छावा
आपल्या शिवाय नसता मिळाला
आम्हास स्वराज्याचा ठेवा
जय भवानी… जय शिवाजी… जय जिजाऊ
थोर आपले कर्म जिजाऊ
उपकार कधी ना फिटणार
सूर्य- चंद्र असेपर्यंत
नाव आपले न मिटणार
जय भवानी… जय शिवाजी… जय जिजाऊ
मुजरा माझा त्या माँ जिजाऊला
घडविले त्यांनी त्या शूर शिवबाला
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
भारतातील 5 मंदिर जिथला प्रसाद मानला जातो अशुभ, इथे गेलात तर चुकूनही प्रसादाला हात लावू नका
आपलं आयुष्य ज्यांनी स्वराज्याची स्वप्न पाहण्यात
आणि साकारण्यात खर्च केलं
ज्यांनी ह्या रयतेला एक न्हवे दोन छत्रपती दिले
अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त विनम्र अभिवादन
युगपुरुषाला घडवणाऱ्या
राजमाता जिजाऊ साहेब यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा