३१ ऑगस्ट पासून भाद्रपद महिना सुरु होणार आहे. भाद्रपद महिन्यामधील कृष्ण पक्षातील पाचवा दिवस हा रक्षापंचमी (Raksha Panchami) ओळखला जातो. रक्षाबंधनाच्या ५ दिवसांनी आणि जन्माष्टमीच्या तीन दिवस आधी रक्षापंचमी साजरी केली जाते. असे म्हंटले जाते की ज्या बहिणी आपल्या भावांना कोणत्याही कारणामुळे रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) दिवशी राखी बांधू शकल्या नाहीत, त्या रक्षापंचमीला हे काम करू शकतात. त्याचबरोबर या दिवशी गणपती आणि शिवाची पूजा देखील केली जाते. या वर्षीच्या रक्षा पंचमीची तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व या लेखात सांगणार आहोत.
यावर्षी ४ सप्टेंबर २०२३ रोजी रक्षापंचमी साजरी केली जाणार आहे. रक्षा पंचमीला रेखा पंचमी, शांती पंचमी असे म्हंटले जाते. त्याचबरोबर या दिवशी गोगा पंचमी देखील साजरी केली जाते. या दिवशी गुजरातमध्ये सापांची पूजा केली जाते. हा सण प्रामुख्याने ओडिशामध्ये साजरा केला जातो. पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी ०३ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०६.३४ वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी ०४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०४.४१ वाजता संपेल.
नागपूजा मुहूर्त – सकाळी ०६:२४ – सकाळी ०८:५३
राखी बांधण्याची वेळ – सकाळी ०९.३१ ते ११.०४
शिव-गणेश पूजन मुहूर्त – ०६.२४ am – ०७.५७ am
नाथ समाजामधील लोक रक्षापंचमीच्या दिवशी भैरवाच्या देवतेची पूजा करतात आणि ज्या बांधवाना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधता आली नाही ते या दिवशी आपल्या बहिणींना राखी बांधू शकतात. शास्त्रानुसार रक्षापंचमीच्या दिवशी वक्रतुंडाच्या रूपामध्ये हरिद्र गणेशाला दुर्वा आणि मोहरी अर्पण करण्याचा नियम आहे. यामुळे भावाला आरोग्य आणि कुटूंबामध्ये समृद्धी प्राप्त होते. भगवान शंकराचा अवतार असलेल्या भैरवथाचीही या दिवशी पूजा केली जाते. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी राहते आणि शत्रूपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.