Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न

११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 12, 2025 | 07:04 PM
रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून, एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न

रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून, एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून महामंडळाला १३७.३७ कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

पोलीस अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना धक्काबुक्की, छावा संघटनेचा आरोप; आंदोलनाचाही दिला इशारा

मंत्री सरनाईक म्हणाले की, दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी ) या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण, या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनच्या सणाच्या कालावधी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधन च्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३०.०६ कोटी रुपये रक्षाबंधन दिवशी म्हणजे शनिवारी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ३३.३६ कोटी रुपये तर सोमवारी तब्बल ३९..९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले.

रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ८-११ ऑगस्ट या ४ दिवसात १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख आहे. रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आभार मानले आहेत. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करुन विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

अशी राहिली ओवाळणीची रक्कम

८ ऑगस्ट : ३० कोटी, सहा लाखांचे उत्पन्न. (त्यात नागपूर जिल्ह्याचे उत्पन्न ४५ लाख, ९५ हजार, २५९ रुपये आहे)
९ ऑगस्ट : रक्षाबंधनाचा मुख्य दिवस – ३४ कोटी, ८६ लाखांचे उत्पन्न (त्यात नागपूर जिल्ह्याचे उत्पन्न ६० लाख, ९६ हजार, ५७६ रुपये)
१० ऑगस्ट : ३३ कोटी, ३६ लाखांचे उत्पन्न (नागपूर जिल्ह्याचे उत्पन्न ५६ लाख, ६४ हजार, ६२५ रुपये)
११ ऑगस्ट : सर्वाधिक ३९ कोटी, ९ लाखांचे उत्पन्न (नागपूर जिल्ह्याचे उत्पन्न ६८ लाख, ८६ हजार, १८६ रुपये)

परिवहन मंत्र्यांकडून आभार

रक्षाबंधनाच्या सणानिमित्त एसटीला मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आभार मानले आहे. त्यांनी घरी सण असताना देखिल कर्तव्याला प्राधान्य देऊन एसटीच्या तिजोरीत विक्रमी उत्पन्नाची भर घालणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही आज जारी केलेल्या एका पत्रातून अभिनंदन केले आहे.

Cabinet Decision : रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी, आता क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

Web Title: Brothers and sisters filled sts coffers on raksha bandhan income of rs 137 crore in 4 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • maharshtra
  • Raksha Bandhan
  • st bus

संबंधित बातम्या

Farmer Suicide:  १०७८६ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर
1

Farmer Suicide: १०७८६ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर

St Bus App : एसटी बस कुठे पोहचली आहे? आता मोबाईलवरच ठावठिकाणा कळणार; कसं ते जाणून घ्या
2

St Bus App : एसटी बस कुठे पोहचली आहे? आता मोबाईलवरच ठावठिकाणा कळणार; कसं ते जाणून घ्या

ST Fare Hike: सरकारवर ओढवली नामुष्की! एका दिवसात निर्णय बदलण्याची वेळ, भाडेवाढ रद्द
3

ST Fare Hike: सरकारवर ओढवली नामुष्की! एका दिवसात निर्णय बदलण्याची वेळ, भाडेवाढ रद्द

ST Fare Hike: ‘लालपरी’ महागली! ऐन दिवाळीआधी सर्वसामान्यांचा खिसा फाटणार; तिकीट दरात तब्बल…
4

ST Fare Hike: ‘लालपरी’ महागली! ऐन दिवाळीआधी सर्वसामान्यांचा खिसा फाटणार; तिकीट दरात तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.