पालघरमध्ये देखील आज जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह पाहायला मिळाला . जिल्ह्यातील ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आदिवासी पारंपारिक वेशभूषेत आदिवासींनी आपली पारंपारिक वाद्य आणि नृत्य सादर केली. यावेळी डहाणू डहाणू विधानसभेचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी तारपा या पारंपारिक आदिवासी वाद्याच्या तालावर ठेका धरला . आदिवासी रूढी , परंपरा कायम रहाव्या म्हणून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली देखील डहाणू येथे भव्य रॅलीकडून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला असून यावेळी आमदार निकोले यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .