Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शताब्दी’त दुर्मीळ मेंदूतील गाठीवर उपचार! ९ वर्षीय मुलीला नवजीवन; संसर्गातून उद्भवलेल्या आजारावर मात

मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील गाठीमध्येही आंशिक सुधारणा दिसून आली. रुग्णालयात काही दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर मुलीला स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले असून ती सध्या नियमित फॉलोअपवर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2026 | 09:35 AM
'शताब्दी'त दुर्मीळ मेंदूतील गाठीवर उपचार! ९ वर्षीय मुलीला नवजीवन; संसर्गातून उद्भवलेल्या आजारावर मात

'शताब्दी'त दुर्मीळ मेंदूतील गाठीवर उपचार! ९ वर्षीय मुलीला नवजीवन; संसर्गातून उद्भवलेल्या आजारावर मात

Follow Us
Follow Us:

उपनगरातील कांदिवली शताब्दी रुग्णालयात डॉक्टरांनी अत्यंत दुर्मीळ आणि गुंतागुंतीच्या आजारावर यशस्वी उपचार करत ९ वर्षीय मुलीला नवजीवन दिले आहे. कानातील कोलेस्टिटोमा या आजारातून मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये गाठ (सेरेब्रल व्हेनस सायनस थ्रोम्बोसिस) निर्माण होऊन में दार परिणाम झालेल्या या गंभीर प्रकरणात डॉक्टरांनी वेळेवर निदान आणि उपचार करून रुग्णाची प्रकृती स्थिर केली. खासगी रुग्णालयांमध्ये दोन ते अडीच लाख रुपये लागणारी ही शस्त्रक्रिया पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात मोफत करून दिल्याने पालकांनी आभार मानले. डोकेदुखी, ताप, उलट्या आणि शुद्ध हरपणे अशा लक्षणांसह दाखल झालेल्या या मुलीची प्रकृती सुरुवातीला गंभीर होती.(फोटो सौजन्य – istock)

High Blood Pressure वाढवण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ गंभीर चुका! तरुण वयातच घ्याव्या लागतील उच्च रक्तदाबाच्या गोळ्या

उजव्या कानामधून आढळून आला होता संसर्ग

दरम्यान उपचारांमधील तपासण्यांमध्ये मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये गाठ, मेंदूज्वराची लक्षणे आणि उजव्या कानातील संसर्ग आढळून आला. तातडीने अतिदक्षता विभागात उपचार सुरू करत अँटिबायोटिक्स, रक्त पातळ करणारी औषधे देण्यात आले. पुढील तपासणीत दोन्ही कानात कोलेस्टिटोमा आणि उजव्या बाजूला मास्टॉईडायटिस आढळून आल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.यशस्वी शस्त्रक्रिया, योग्य औषधोपचार आणि सतत निरीक्षण यामुळे रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारत गेली.

‘हे प्रकरण दुर्मीळ आणि आव्हानात्मक होत असून येथील डॉक्टरांनी वेळेवर निदान करून अद्ययावत उपचार पद्धती वापरली, त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवणे शक्य झाले. उपनगरातील रुग्णालये आता अत्याधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी सुसज्ज होत असून अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांवरही यशस्वी उपचार करता येत आहेत.’ – डॉ. अजय गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक, शताब्दी रुग्णालय.

सावधान! महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या काही महिने आधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास ओढावेल मृत्यू

मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील गाठीमध्येही आंशिक सुधारणा दिसून आली. रुग्णालयात काही दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर मुलीला स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले असून ती सध्या नियमित फॉलोअपवर आहे. ईएनटी सर्जन डॉ. राजेश यादव, बालरोग तज्ज्ञ डॉ. राजाराम वेलिंग आणि डॉ. प्राजक्ता जोशी आणि भूलतज्ज्ञ डॉ. विजय रंगलानी अशा टीमने ही शस्त्रक्रिया केली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Rare brain tumor treatment in shatabdi new life for 9 year old girl overcome disease caused by infection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • brain
  • brain tumor
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Memory Decline : साठीनंतर वारंवार विसरायला होतंय? दुर्लक्ष करू नका; कारण काय, लक्षणे वेळीच ओळखा!
2

Memory Decline : साठीनंतर वारंवार विसरायला होतंय? दुर्लक्ष करू नका; कारण काय, लक्षणे वेळीच ओळखा!

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
3

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.