सावधान! महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या काही महिने आधी दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास ओढावेल मृत्यू
हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी उपाय?
हार्ट अटॅकची लक्षणे?
महिला आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी का असतात?
जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉकेज किंवा शरीरसंबंधित इतर घातक आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. हार्ट अटॅक केवळ पुरुषांचं नाहीतर महिलांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकची लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा आणि धूम्रपान इत्यादींसोबत महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम सुद्धा आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या धावपळीमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाही. यामुळे गंभीर आजारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते.(फोटो सौजन्य – istock)
गोळी ठरतेय का गेमचेंजर? कॅन्सरच्या धोक्याला कमी करु शकते ॲस्पिरिन? संशोधनात झालाय खुलासा, जाणून घ्या
महिलांमध्ये दिसून येणारे जोखमीचे घटक म्हणजे गर्भावस्थेतील मधुमेह, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, ताण-तणाव, चिंता, हार्मोनल बदल, ऑटोइम्यून आजार इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या हृदयावर होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. शरीरात दिसून येणाऱ्या अतिशय नाजूक लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया महिलांमध्ये दिसून येणारी हार्ट अटॅकची गंभीर लक्षणे.
हृदयाच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, पालेभाज्या,फळांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. यासोबतच नियमित ध्यान केल्यास मानसिक तणाव कमी होण्यास मदत होईल. रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाशी पोटी नियमित कच्चा लसूण चावून खावा. लसूण खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होण्यास मदत होते. धूम्रपान आणि मद्यपान इत्यादी गोष्टींपासून लांब राहावे. तसेच ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे.
Ans: छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, अत्यंत थकवा, मळमळ, चक्कर येणे, पाठ, मान किंवा जबड्यात वेदना ही लक्षणे काही महिने आधी दिसू शकतात.
Ans: होय, महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे सौम्य किंवा वेगळी असू शकतात. छातीत तीव्र वेदना नसतानाही थकवा, घाम येणे किंवा अपचनासारखा त्रास जाणवू शकतो.
Ans: उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, धूम्रपान, ताणतणाव आणि हार्मोनल बदल (मेनोपॉज) असलेल्या महिलांना धोका जास्त असतो.






