Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात घड्याळ लावताना अजिबात करू नका ‘या’ चुका; वाचा काय सांगतं वास्तुशास्त्र

रत्येक गोष्ट योग्य दिशेला, योग्य ठिकाणी ठेवल्यानं घरात सकारात्मकता येते. अशाच पद्धतीनं घराच्या भिंतीवरील घड्याळाबाबत वास्तुशास्त्राचे काही नियम सांगण्यात आले आहेत.

  • By Aparna Kad
Updated On: May 10, 2022 | 01:43 PM
घरात घड्याळ लावताना अजिबात करू नका ‘या’ चुका; वाचा काय सांगतं वास्तुशास्त्र
Follow Us
Follow Us:

वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) घरासाठी अनेक नियम सांगितले आहेत. त्याप्रमाणे घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी आणि लावण्यासाठीही काही नियम आहेत. त्यानुसार त्या शुभ आणि फलदायी ठरतात. तसेच घरात नेहमी सकारात्मकता राहते. प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला, योग्य ठिकाणी ठेवल्यानं घरात सकारात्मकता येते. अशाच पद्धतीनं घराच्या भिंतीवरील घड्याळाबाबत वास्तुशास्त्राचे काही नियम सांगण्यात आले आहेत.

घड्याळाचं घरात खूप महत्त्व असतं. त्यामुळे त्याची जागाही योग्यच हवी. घराच्या भिंतीवरील घड्याळ केवळ वेळच सांगत नाही, तर अनेक शुभ आणि अशुभ संकेतही देते. वास्तू नियमांनुसार घड्याळाचा वापर चुकीच्या पद्धतीने झाल्यास आपले नुकसान होते. घड्याळाचा जीवनावर परिणाम होतो. घरातील बंद पडलेलं घड्याळ नकारात्मकता पसरवते. तसेच घरही घड्याळासारखे निर्जीव होते. घड्याळाबाबत वास्तुशास्त्राचे नियम जाणून घेऊया.

वास्तुनुसार घड्याळाबाबतीत या गोष्टी लक्षात ठेवा

  • बंद घड्याळ अशुभ

वास्तु तज्ज्ञांच्या मते, बंद घड्याळ हे अशुभतेचे सूचक आहे. ज्या घरात घड्याळ बंद ठेवले जाते, त्या घरात रोगांचा वावर सुरू होतो. पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. यासोबतच घरात नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नका. घड्याळाशी संबंधित काही खास गोष्टींची काळजी घेतली तर तुमचा वाईट काळही चांगल्यामध्ये बदलू शकतो.
  • दक्षिण दिशेला घड्याळ लावू नका

वास्तूनुसार घराची दक्षिण दिशा ही स्थिरतेची दिशा असते. या दिशेला घड्याळ लावल्याने तुमच्या घराची प्रगती थांबू शकते. यासोबतच असे मानले जाते की, या दिशेला घड्याळ लावल्याने घरातील प्रमुखाचे आरोग्य बिघडू लागते. तसेच उधळपट्टीही वाढू लागते. त्यामुळे घरात अनेक समस्या वाढू लागतात आणि नकारात्मक वातावरण तयार होते. घराच्या दक्षिण दिशेला यमाची दिशा म्हणतात, त्यामुळे या कोपऱ्यात घड्याळ लावल्याने घरातील सदस्यांची प्रगती थांबते.
  • दारावर घड्याळ लावू नका

असे मानले जाते की, जर एखाद्या व्यक्तीने घराच्या दारावर घड्याळ लावले तर त्याच्या कामात ताण-तणाव वाढू शकतो. यामुळे त्याला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्याचवेळी वास्तूनुसार अशा ठिकाणी घड्याळ लावणे टाळावे की, आत प्रवेश करताच लोकांची नजर घड्याळावर पडेल. हे अशुभ मानले जाते.

Web Title: Read vastushastra tips for clock in home nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2022 | 01:08 PM

Topics:  

  • clock
  • daily vastu tips
  • Vastu Tips
  • Vastushastra

संबंधित बातम्या

Vastu Tips: फ्रीजची दिशा आणि रंग बदलू शकतात घराचं नशीब? सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम!
1

Vastu Tips: फ्रीजची दिशा आणि रंग बदलू शकतात घराचं नशीब? सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम!

Vastu Tips: आर्थिक चणचण आणि घरात सतत वाद होत असल्यास वास्तूचे करा हे प्रभावी उपाय
2

Vastu Tips: आर्थिक चणचण आणि घरात सतत वाद होत असल्यास वास्तूचे करा हे प्रभावी उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.