
Vastu Tips: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
Vastu Tips :आपल्याकडे हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व दिलं जातं. घर कसं असावं, कोणती वस्तू कुठे ठेवावी याने घरात सुख-शांती राहते असं मानलं जातं. आपण घराचं मुख्य दार, बेडरूम, देवघर या सगळ्याचा विचार करतो, पण स्वयंपाकघरातल्या फ्रीजकडे कुणाचं लक्षच जात नाही. पण वास्तुशास्त्रात फ्रीज कुठे ठेवायचा आणि कोणत्या रंगाचा घ्यायचा याबद्दल पण नियम सांगितले आहेत. Vastu Tips:
फ्रीज तर प्रत्येकाच्या घरात असतोच. अन्न टिकवून ठेवण्यासाठी तो लागतोच. पण तो चुकीच्या ठिकाणी ठेवला तर घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि पैशाची चणचण भासते असं वास्तुतज्ज्ञ सांगतात. चला तर मग पाहूया फ्रीज बद्दलचे महत्त्वाचे नियम.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात फ्रीज ठेवण्यासाठी सगळ्यात चांगली जागा म्हणजे नैऋत्य कोपरा. म्हणजे दक्षिण-पश्चिम दिशा. या दिशेला फ्रीज ठेवला तर घरात स्थिरता राहते. दुसरा चांगला ऑप्शन म्हणजे वायव्य कोपरा, म्हणजे उत्तर-पश्चिम दिशा.काही तज्ज्ञ आग्नेय कोपरा, पश्चिम दिशा किंवा उत्तर दिशा पण फ्रीजसाठी चांगली आहे असं सांगतात. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, चुकूनही फ्रीज ईशान्य दिशेला ठेवू नका. ईशान्य दिशा म्हणजे उत्तर-पूर्व कोपरा. ही दिशा देवांची दिशा मानली जाते, खूप पवित्र असते. तिथे फ्रीजसारखी जड वस्तू ठेवल्याने घरातल्या सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होतो. त्यामुळे ही चूक करू नका.
जर तुमचं किचन छोटं असेल तर असं बघा की फ्रीजचा दरवाजा पूर्ण उघडला जाईल आणि ये-जा करायला अडथळा येणार नाही.
बऱ्याच घरांमध्ये जागा कमी असल्यामुळे फ्रीज अगदी गॅस शेगडीला चिकटून ठेवला जातो. पण वास्तुशास्त्र आणि सायन्स दोन्हीनुसार हे चुकीचं आहे.
Dasara 2026: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरी आणा ‘या’ वस्तू; सुख-समृद्धीसाठी मानल्या जातात शुभ
वास्तुशास्त्रात गॅस शेगडी म्हणजे अग्नी तत्त्व आणि फ्रीज म्हणजे थंड, पाण्याचं तत्त्व. अग्नी आणि पाणी हे दोन एकमेकांचे शत्रू आहेत. त्यांना एकमेकांच्या जवळ ठेवलं तर घरात भांडणं वाढतात, असं मानलं जातं.
प्रॅक्टिकली विचार केला तरी गॅसच्या गरमीमुळे फ्रीजच्या कॉम्प्रेसरवर जास्त लोड येतो. त्यामुळे लाईट बिल जास्त येतं आणि फ्रीज लवकर खराब होतो. म्हणून या दोघांमध्ये कमीत कमी 3 ते 4 फूट अंतर नक्की ठेवा.
फ्रीज घेताना आपण फक्त डिझाईन पाहतो, पण रंग पण महत्त्वाचा आहे.