Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: आर्थिक चणचण आणि घरात सतत वाद होत असल्यास वास्तूचे करा हे प्रभावी उपाय

Vastu Tips: वास्तुशास्त्रामध्ये मुख्य प्रवेशद्वार, स्वयंपाकघर, देव्हारा आणि झोपण्याच्या जागेच्या दिशेबद्दल अनेक नियम सांगण्यात आलेले आहे. आपल्या घरात शांती, आनंद आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तूच्या या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जाणून घ्या वास्तूचे नियम

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 16, 2026 | 10:26 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आर्थिक चणचण आणि घरात सतत वाद होत असल्यास वास्तूचे करा हे उपाय
  • वास्तुशास्त्रात घरासंबंधी कोणते नियम सांगितले आहे
  • वास्तुच्या नियमांमुळे घरातील वातावरण बदलण्यास होते मदत
 

घरात सकारात्मक आणि शांततापूर्ण वातावरण राहण्यासाठी स्वच्छता आणि सुव्यवस्थेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. भारतीय परंपरेनुसार, वास्तुशास्त्रात घरातील आनंद, समृद्धी आणि सकारात्मकतेशी जोडलेली आहेत. असे मानले जाते की घराच्या दिशेनुसार वस्तूंची मांडणी करणे आणि काही विशिष्ट नियमांचे पालन केल्याने घरातील वातावरण सुधारण्यास मदत होते. यापैकी काही वास्तूचे नियम सविस्तर जाणून घेऊया

वास्तुच्या या नियमांमुळे बदलू शकते घरातील वातावरण

घराची ईशान्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार घराची ईशान्य दिशा महत्त्वाची मानली जाते. ही जागा स्वच्छ आणि मोकळी ठेवा. येथे जड कपाटे, निरुपयोगी वस्तू किंवा चपला ठेवणे टाळा. या दिशेत प्रार्थना कक्ष बांधणे शुभ मानले जाते.

Vastu Tips: स्वयंपाकघरात फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? जाणून घ्या वास्तूचे नियम

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभ चिन्ह

घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. प्रवेशद्वारावर स्वस्तिक, ओम किंवा शुभ लाभ यांसारखी शुभ चिन्हे रंगवणे शुभ मानले जाते. दारावर फुलांची माळ किंवा हार लावण्याचीही परंपरा आहे. स्वस्तिक, ओम किंवा शुभ लाभ यांसारखी वास्तुशास्त्रातील चिन्ह लावणे शुभ मानले जाते.

आग्नेय दिशेचे महत्त्व

वास्तुशास्त्रानुसार, आग्नेय दिशा म्हणजेच अग्नी कोन, स्वयंपाकघरासाठी आदर्श मानली जाते. स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करा. स्टोव्ह आणि सिंक एकमेकांच्या खूप जवळ ठेवणे टाळा.

उत्तर दिशेचा संबंध कुबेरांशी मानला जातो

तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला अशा प्रकारे ठेवा की, उघडल्यावर तिचे दार उत्तरेकडे असेल. उत्तर दिशा भगवान कुबेरांशी संबंधित आहे.

Vastu Tips: रस्त्यात सापडलेल्या ‘या’ वस्तू घरी आणणं पडू शकतं महागात …

बेडरूममध्ये आरसा लावणे टाळा

आरसा लावण्यासाठी उत्तर किंवा पूर्वेकडील भिंत ही सर्वोत्तम जागा मानली जाते. झोपताना तुमच्या शरीराचे प्रतिबिंब दिसेल अशा प्रकारे बेडरूममध्ये आरसा लावणे टाळा.

कापूर किंवा धूप जाळणे शुभ

सूर्यास्ताच्या वेळी मुख्य प्रवेशद्वार आणि देव्हाऱ्याजवळ उजेड असावा. या वेळी कापूर किंवा धूप जाळणे शुभ मानले जाते.

झोपण्याची दिशा

झोपताना दक्षिण किंवा पूर्व दिशेकडे तोंड करणे शुभ मानले जाते. उत्तरेकडे डोके करून झोपणे टाळा. तसेच, वापरानंतर बाथरूमचा दरवाजा बंद ठेवा आणि ती जागा स्वच्छ ठेवा. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये काचेच्या भांड्यात सैंधव मीठ ठेवण्याची शिफारस केली जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: घरात पैसा टिकण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाची दिशा कोणती?

    Ans: उत्तरा आणि ईशान्य (उत्तर-पूर्व) ही दिशा सर्वात महत्त्वाची मानली जाते. उत्तर दिशा ही धनदेवता कुबेराची मानली जाते, त्यामुळे ही दिशा नेहमी स्वच्छ आणि अडगळीशिवाय ठेवावी.

  • Que: तिजोरी किंवा पैशांचे कपाट कोणत्या दिशेला ठेवावे?

    Ans: तिजोरी घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) भिंतीला टेकवून अशी ठेवावी, जेणेकरून तिचे दार उत्तरेकडे उघडेल.

  • Que: घरात बंद पडलेली घड्याळ किंवा फुटलेली काच ठेवल्याने काय होते?

    Ans: बंद पडलेली घड्याळे प्रगती रोखतात आणि वास्तुदोष निर्माण करतात. तर फुटलेली काच किंवा भांडी घरात नकारात्मक ऊर्जा आणि कौटुंबिक क्लेश वाढवतात

Web Title: Vastu tips follow these vastu remedies to overcome financial problems pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: स्वयंपाकघरात फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? जाणून घ्या वास्तूचे नियम
1

Vastu Tips: स्वयंपाकघरात फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? जाणून घ्या वास्तूचे नियम

Vastu Tips: रस्त्यात सापडलेल्या ‘या’ वस्तू घरी आणणं पडू शकतं महागात? जाणून घ्या काय आहे समज
2

Vastu Tips: रस्त्यात सापडलेल्या ‘या’ वस्तू घरी आणणं पडू शकतं महागात? जाणून घ्या काय आहे समज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.