रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यानंतर करा 'हे' उपाय
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर पचनक्रिया बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोट स्वच्छ न होणे, अपचन, गॅस इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यातील प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे पोट स्वच्छ न होणे. पोट स्वच्छ न झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू लागतात. पोटात साचून राहिलेले विषारी पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. हे पदार्थ पोटात साचून राहिल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. पोटातील घाण तशीच साचून राहिल्यामुळे अपचनच नाहीतर डोके दुखीचा त्रास होण्यास सुरुवात होते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे योग्य लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोट कोमट पाण्यात लिंबू पिळून लिंबाचे पाणी प्यावे. यामुळे तुमचे पोट स्वच्छ होईल आणि पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. शिवाय तुम्ही या पाण्यात मध मिक्स करून सुद्धा पिऊ शकता.
आयुर्वेदामध्ये त्रिफळाला विशेष महत्व आहे. कोमट पाण्यात रात्री झोपण्याआधीक एक किंवा दोन त्रिफळा रात्री पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन करावे. यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्यामुळे आतड्यांमधील घाण स्वच्छ होते.
बडीशेपचे पाणी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. या रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बडीशेप भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन करा. यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल आणि पोट स्वच्छ होईल. अपचनाच्या सम्येपासून आराम मिळवण्यासाठी बडीशेप अतिशय प्रभावी आहे.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
रात्रीच्या वेळी जेवल्यानंतर अनेकांना दूध पिण्याची सवय असते. अशावेळी तुम्ही दुधामध्ये तूप मिक्स करून पिऊ शकता. यामुळे आतड्यांमाधोळ घाण स्वच्छ होईल आणि शरीराला आराम मिळेल.