Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांसाठी दिलासा! जसलोक हॉस्पिटलमध्ये ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया यशस्वी

जसलोक हॉस्पिटलने ब्रेस्ट कॅन्सर रुग्णावर यशस्वी 'व्रणरहित' एंडोस्कोपिक मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया केली. TiLoop मेश वापरून इम्प्लान्ट पुनर्बांधणीसह भारतात दुसरा राष्ट्रीय मापदंड प्रस्थापित.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 14, 2025 | 06:24 PM
जसलोक हॉस्पिटलमध्ये 'व्रणरहित' शस्त्रक्रिया यशस्वी (Photo Credit- सोशल मीडिया)

जसलोक हॉस्पिटलमध्ये 'व्रणरहित' शस्त्रक्रिया यशस्वी (Photo Credit- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२५: मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ दुसरी आणि जसलोकमधील पहिली “स्कारलेस” मास्टेक्टमी असून, ती २७ वर्षीय अविवाहित महिलेवर यशस्वीरीत्या करण्यात आली.

रुग्णाच्या डाव्या स्तनामध्ये ४-५ सेंमी आकाराची गाठ आढळल्यानंतर तिला केमोथेरपीद्वारे उपचार देण्यात आले. पुढील जनुकीय तपासणीत BRCA जीन पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्याने, प्रगत शस्त्रक्रिया आवश्यक ठरली. पारंपरिक मास्टेक्टमीमुळे मोठा व्रण राहण्याचा धोका असल्याने, एंडोस्कोपिक पद्धत निवडण्यात आली. या प्रक्रियेत छातीच्या बाजूला केवळ ३-४ सेंमीचे छिद्र करून शस्त्रक्रिया केली जाते, ज्यामुळे संवेदना टिकतात आणि कॉस्मेटिक परिणाम उत्तम मिळतात.

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे ऑन्कोप्लासटिक व रोबोटिक ब्रेस्ट सर्जन डॉ. संदीप एम. बिप्ते म्हणाले, “स्तनांच्या कर्करोगाचे निदान झालेल्या तरुण महिलेचे होणारे भावनिक नुकसान हे शारीरिक हानीइतकेच लक्षणीय ठरू शकते. आमचा रुग्ण शस्त्रक्रियेनंतर ठळकपणे दिसणाऱ्या व्रणाबाबत तसेच शारीरिक स्व-प्रतिमेबद्दल प्रचंड चिंतित होता. मूल्यमापनानंतर आम्ही एंडोस्कोपिक स्किन-अँड निपल स्पेअरिंग मास्टेक्टमीचा सल्ला दिला. या प्रगत, मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जिकल प्रक्रियेमध्ये कर्करोगाशी संबंधित सुरक्षितता आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने साधलेली एकसंधता या दोहोंची खबरदारी घेतली जाते, ज्यामुळे रुग्णांना त्यांचा आत्मविश्वास, स्व-प्रतिमा आणि जीवनमानाचा दर्जा पुन:प्रस्थापित होतो. ही गोष्ट किती परिवर्तनकारी ठरू शकते याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.

Breast Cancer Awareness Month : कृत्रिम बुद्धिमत्ता स्तनाच्या कर्कराेगावर ठरणार वरदान! कसे असणार नवे तंत्रज्ञान?

येथे, जसलोक हॉस्पिटलमध्ये या प्रक्रियेला मिळालेले यश हे केवळ शस्त्रक्रियात्मक नवसंकल्पनांचे नाही तर आमच्या संपूर्ण टीमने दिलेल्या भक्कम आधाराचे व त्यांच्यातील समन्वयाचे द्योतक आहे. या संपूर्ण वाटचालीत माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी डॉ. सदाशिव चौधरी, नर्सिंग टीम आणि जसलोक हॉस्पिटलच्या संपूर्ण कर्मचारीवर्ग यांच्याप्रती विशेषत्वाने कृतज्ञ आहे.” ही प्रक्रिया कोणत्याही गुंतागूंतीविना पूर्ण करण्यात आली, परिणामी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अगदी कमी अस्वस्थाता वाटली व तिची तब्येत सुरळीतपणे पूर्ववत झाली. रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर अवघ्या एका दिवसात घरी पोहोचविण्यात आले.

या केसविषयी बोलताना चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्हणाले, “हा महत्त्‍वपूर्ण टप्पा म्हणजे जसलोक हॉस्पिटलसाठीचा एक अभिमानाचा क्षण आहे. पश्चिम भारतातील पहिली व्रणरहित एंडोस्कोपिक मास्टेक्टमी व त्यासोबत तत्काळ रिकन्स्ट्रक्शनची शस्त्रक्रिया पार पाडण्यातून नवसंकल्पना आणि रुग्ण-केंद्रित देखभालीप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. तरुण रुग्णाची तब्येत सुरळीतपणे पूर्ववत झाली आहे, यातून या प्रक्रियेची सुरक्षितात, अचूकता आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांचे अधिक चांगले परिणाम मिळण्याचे आश्वासन ठळकपणे दिसते.” रुग्ण वैभवी (नाव बदललेले) म्हणाल्या, “ही शस्त्रक्रिया माझ्यासाठी केवळ उपचार नव्हता, तर नव्या आत्मविश्वासाची सुरुवात होती. आज आरशात स्वतःकडे पाहताना मला संपूर्ण व्यक्ती असल्याचा अभिमान वाटतो.”

Breast Cancer: स्तन कर्करोगाच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, खूप उशीर होण्यापूर्वी स्वतःला वाचवा

Web Title: Relief for breast cancer patients sore free surgery successful at jaslok hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 06:22 PM

Topics:  

  • Breast Cancer
  • cancer
  • lifesytle news

संबंधित बातम्या

Breast Cancer Awareness Month : कृत्रिम बुद्धिमत्ता स्तनाच्या कर्कराेगावर ठरणार वरदान! कसे असणार नवे तंत्रज्ञान?
1

Breast Cancer Awareness Month : कृत्रिम बुद्धिमत्ता स्तनाच्या कर्कराेगावर ठरणार वरदान! कसे असणार नवे तंत्रज्ञान?

Breast Cancer: स्तन कर्करोगाच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, खूप उशीर होण्यापूर्वी स्वतःला वाचवा
2

Breast Cancer: स्तन कर्करोगाच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, खूप उशीर होण्यापूर्वी स्वतःला वाचवा

Breast Cancer: स्तन कर्करोग हा केवळ महिलांचा आजार? पुरुषांमध्येही वाढतोय स्तनाच्या कर्करोगाचा धोका
3

Breast Cancer: स्तन कर्करोग हा केवळ महिलांचा आजार? पुरुषांमध्येही वाढतोय स्तनाच्या कर्करोगाचा धोका

वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो? आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष न करता घ्या काळजी
4

वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो? आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष न करता घ्या काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.