Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Cancer Day 2026: भारतातील Breast Cancer वर 4 उपचारपद्धती, जगण्याची शक्यता वाढवण्यास करतील मदत

४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. कर्करोगाबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी नक्की कोणते उपाय करता येतील आणि कशा पद्धतीने हा आजार बरा करता येऊ शकतो जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 03, 2026 | 12:43 PM
भारतातील ४ उपायपद्धती ज्यामुळे स्तनाचा कर्करोग बरा होण्याची शक्यता अधिक (फोटो सौजन्य - iStock)

भारतातील ४ उपायपद्धती ज्यामुळे स्तनाचा कर्करोग बरा होण्याची शक्यता अधिक (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक कर्करोग दिनानिमित्त महत्त्वाची माहिती 
  • स्तनाच्या कर्करोगावरील उपायपद्धती
  • दीर्घायुष्यासाठी काय करावे 
जागतिक कर्करोग दिनानिमित्त भारतात स्‍तनाच्‍या कर्करोगाबाबत चर्चेला आता शांतपणे व अर्थपूर्णपणे वळण मिळत आहे. एकेकाळी कर्करोग झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या जगण्‍याबाबत चर्चा केली जायची, पण आज दीर्घायुष्‍य, जीवनाचा दर्जा आणि कर्करोगावरील उपचारादरम्‍यान व उपचारानंतर उत्तम जीवन यांबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे. निदान चाचण्‍यांमधील प्रगती, लक्ष्यित उपचारपद्धती आणि सहाय्यक केअर सुविधा यामुळे स्‍तनाच्‍या कर्करोगाचे विचारपूर्वक व्‍यवस्‍थापन करता येऊ शकते.

मुंबईतील एचसीजी कॅन्‍सर सेंटरच्‍या मेडिकल ऑन्‍कोलॉजीच्‍या एचओडी डॉ. इंदू आंबुलकर म्‍हणाल्‍या, ”आज स्तनाच्या कर्करोगातून वाचणे उपचार पूर्ण करण्‍यापर्यंत मर्यादित राहिलेले नाही. तपासणी, निदान व उपचारांमध्‍ये प्रगतीमुळे आजाराच्‍या विविध टप्‍प्‍यांवर मोठ्या प्रमाणात उत्तम परिणाम निदर्शनास येत आहेत. यामुळे अनेक रूग्‍ण आजारावर उत्तमप्रकारे नियंत्रण ठेवून जीवन जगत आहेत. तसेच, उपचारांचे निर्णय आता अधिकाधिक वैयक्तिकपणे घेतले जात आहेत, ज्यामध्ये ट्यूमरची रचना, आजार पुन्हा होण्‍याचा धोका आणि रुग्णाचे एकूण आरोग्य व जीवनातील टप्‍पा यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. ही उपचारपद्धत जगण्‍याची शक्‍यता वाढवण्‍यासोबत जीवनाचा दर्जा सुधारण्‍यास देखील मदत करते. यामुळे रूग्‍ण पुढील जीवनाचे नियोजन करू शकतात, सक्रिय राहू शकतात आणि कर्करोगावरील उपचारादरम्‍यान व उपचारानंतर उत्तम जीवन जगण्‍यावर लक्ष केंद्रित करू शकतात.” 

Early Breast Cancer: कॅन्सरचे निदान झाल्यानंतर लवकर उपचार करणे आवश्यक, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Breast Cancer वरील 4 उपचारपद्धती 

खाली स्‍तनाच्‍या कर्करोगावरील आधुनिक उपचारपद्धतींचे चार मार्ग दिले आहेत, जे भारतातील रूग्‍णांची जगण्‍याची शक्‍यता वाढवू शकतात: 

  • समान उपचाराऐवजी वैयक्तिकृत उपचाराला प्राधान्‍यः स्तनाच्या कर्करोगामध्ये अनेक उपप्रकार असतात, जसे हार्मोन रिसेप्टर-पॉझिटिव्ह, HER2-पॉझिटिव्ह, आणि ट्रिपल-निगेटिव्ह. या प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतीची आवश्यकता असते. निदान चाचण्यांमधील प्रगतीमुळे आता डॉक्टरांना ट्यूमरच्‍या विशिष्‍टतेनुसार उपचार ठरवणे शक्य झाले आहे. या अचूक पद्धतीमुळे उपचाराची परिणामकारकता सुधारण्‍यास मदत होते, तसेच प्रतिकूल परिणाम कमी होतात. यामुळे रूग्‍णाला शारीरिक आणि मानसिक स्थिरतेसह सहजपणे उपचाराला प्रतिसाद देता येतो
  • कर्करोग पुन्‍हा होण्‍याच्‍या धोक्‍याचे सक्रिय व्‍यवस्‍थापनः सुरुवातीला उपचार यशस्वी झाल्यानंतर देखील अनेक रुग्णांच्या मनात कर्करोग पुन्हा होण्‍याबाबत भिती असते. काही केसेसमध्‍ये हा धोका ५० टक्‍के असू शकतो. आजच्या नवीन मान्‍यताप्राप्‍त प्रगत उपचार पद्धतींमध्‍ये कर्करोगाच्या वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या विशिष्ट पेशी मार्गांवर प्रत्‍यक्ष लक्ष्य केले जाते. पारंपारिक उपचारांच्या तुलनेत या प्रगत उपचारामुळे कर्करोग पुन्हा होण्याचा धोका जवळपास ३० टक्‍क्‍यांनी कमी होण्यास मदत होते. तसेच वैयक्तिक फॉलो-अप प्लॅन्स, सतत परीक्षण आणि सहाय्यक केअर यामुळे रुग्णांना अधिक सुसज्‍ज असल्‍याारखे वाटण्‍यास मदत होते आणि अनिश्चिततेचा ताण येत नाही, ज्यामुळे ते उपचार करण्‍यासोबत दीर्घकाळापर्यंत आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याला प्राधान्‍य देतात
  • जीवनाचा दर्जा उत्तम राखत आजारावर दीर्घकालीन नियंत्रणः नवीन उपचार पद्धतींमुळे रूग्‍णांना आजारावर नियंत्रण ठेवता येते, तसेच दैनंदिन कामकाज सहजपणे करता येतात. उपचाराशी संबंधित अडथळे दूर करत आणि केअर योजनांमध्‍ये स्थिरता आणत रुग्ण दैनंदिन कामे करू शकतात, नोकरीवर जाऊ शकतात आणि कुटुंबासोबत व सामाजिक जीवनात सक्रियपणे जीवन जगण्‍याचा आनंद घेऊ शकतात. या परिवर्तनासाठी समज असली पाहिजे की रूग्‍णाची उत्तम जीवनशैली, सक्रियता यावर जगण्‍याची शक्‍यता अवलंबून असते
  • उपचारामध्‍ये भावनिक आणि सहाय्यक केअरचा समावेशः उपचारादरम्‍यान प्रकृतीमध्‍ये सुधारणा होते तसे स्‍तनाच्‍या कर्करोगादरम्‍यान घेतल्‍या जाणाऱ्या केअरमध्‍ये भावनिक आरोग्‍य व जीवन जगण्‍याचे नियोजन हे महत्त्वपूर्ण भाग बनतात. उपचारामध्‍ये समुपदेशन, लक्षणांचे व्‍यवस्‍थापन आणि मानसिक आरोग्‍य उत्तम राखण्‍याबाबत साह्य यांचा समावेश केला जातो. चिंता, थकवा आणि भावनिक तणाव दूर केल्‍याने रूग्‍णांना उपचारामध्‍ये स्थिरता मिळते, तसेच सक्रिय उपचाराव्‍यतिरिक्‍त अधिक आत्‍मविश्वासाने जीवन जगण्‍यास प्रेरणा मिळते. 
नवजात आईमध्ये Breast Cancer च्या छुप्या लक्षणांचा धोका, कसे ओळखाल; तज्ज्ञांनी सांगितले

Web Title: World cancer day 2026 4 treatment methods for breast cancer in india that will help increase the chances of survival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • Breast Cancer
  • Breast Cancer news
  • cancer
  • world cancer day

संबंधित बातम्या

पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर
1

पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

१० मिनिटांचा व्यायाम Stomach Cancer पासून वाचवेल जीव! कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी जेवणाच्या ताटात असायला हवेत ‘हे’ पदार्थ
2

१० मिनिटांचा व्यायाम Stomach Cancer पासून वाचवेल जीव! कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी जेवणाच्या ताटात असायला हवेत ‘हे’ पदार्थ

तुम्हालाही Breast cancer तर नाही? कपडे घालताना ही गोष्ट नक्की तपासा, वेळीच टाळता येईल गंभीर समस्या
3

तुम्हालाही Breast cancer तर नाही? कपडे घालताना ही गोष्ट नक्की तपासा, वेळीच टाळता येईल गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.