त्वचेच्या असंख्य समस्यांपासून आराम मिळवून देईल तांदूळ तुरटीचा फेसमास्क
वर्षाच्या बाराही महिने त्वचा आणि केसांसंबधीत समस्या उद्भवू लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर टॅन वाढते तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जाते. याशिवाय हिवळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज वाटू लागते. प्रत्येक ऋतूंमध्ये त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक कारणामुळे त्वचेवर रॅशेज, जळजळ, पिगमेंटेशन आणि टॅनिंग इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचेवर पिंपल्स किंवा रॅश आल्यानंतर त्वचा निस्तेज आणि खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता हळूहळू खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेच्या असंख्य समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तांदूळ तुरटीचा फेसमास्क बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी तुरटी आणि तांदुळाच्या पाण्याचा वापर करावा. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करतात. यासाठी वाटीमध्ये भिजवलेल्या तांदळाचे पाणी घेऊन त्यात तुरटी पावडर टाकून मिक्स करा. नंतर त्यात थोडस गुलाब पाणी टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर 20 मिनिटांनी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. त्वचेवर तुरटीचा फेसमास्क लावल्यानंतर चेहऱ्यावर टोनर किंवा कोणतेही त्वचेला सूट होणारे क्रीम लावावे. हा उपाय आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केल्यास त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
तुरटीचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. यामध्ये नॅचरल एस्ट्रिजेन्ट गुणधर्म असतात. यामुळे तुमची सैल त्वचा घट्ट होते. त्वचेवरील रोमछिद्र मोठी होतात. तसेच कोरियन महिलांप्रमाणे तुम्हीसुद्धा तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. तांदळाचे पाणी त्वचा हायड्रेट ठेवते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित तांदळाच्या पाण्याचे टोनर चेहऱ्यावर लावावे.
तुरटीतील अॅंटी-बॅक्टेरिअल गुणधर्म चेहऱ्यावर आलेले ऍक्ने, पिंपल्स आणि इतर समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतो. याशिवाय त्वचेवर बॅक्टरीया यामुळे नष्ट होतात. त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी आणि तुरटी प्रभावी ठरते.
वाढत्या वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तुरटीच्या पाण्याचा वापर करावा. तुरटीचे पाणी त्वचा कायमच सुंदर ठेवण्यासाठी मदत करते. तांदळाचे पाणी स्किन सेल्सना रिपेअर करून त्वचा आतून स्वच्छ करतात. त्वचेची पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी तांदूळ तुरटीचे पाणी गुणकारी ठरेल. तसेच चेहऱ्यावर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी मदत करते.