Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओरल कॅन्सरच्या रुग्ण संख्येत वाढ! नियमित तोंडाच्या तपासणीने ओळखु शकता गंभीर आजाराचा धोका

कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.मौखिक कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपानाची वाईट सवय सोडणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2025 | 12:28 PM
ओरल कॅन्सरच्या रुग्ण संख्येत वाढ!

ओरल कॅन्सरच्या रुग्ण संख्येत वाढ!

Follow Us
Close
Follow Us:

कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या पाया खालील जमीन सरकते. जगभरात या गंभीर आजाराचे अनेक रुग्ण आहेत. 200 पेक्षा जास्त विविध प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे चुकीची जीवनशैली न जगता शरीरासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. कॅन्सर झाल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यसुद्धा बिघडून जाते. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात दिसणाऱ्या कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्याच्या दिवसांमधे हातापायांना घाम का येतो? जाणून यामागील कारणे आणि घरगुती उपाय

आपल्या देशात तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या जगभरातील एकूण कॅन्सरच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचे वाढते सेवन. आपल्या देश तंबाखूचा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक आहे. यामुळे मौखिक कर्करुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तंबाखू, गुटखा, सिगारेट, किंवा खैनी सेवन करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तोंडाच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे.

मौखिक कर्करोगाची (ओरल कॅन्सर) सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी तुमच्या तोंडांत चार बोट घातली तर ते व्यवस्थित उघडत आहे का, हे तपासा. तसे होत नसेल तर वेळ न दवडता डॉक्टरांशी संपर्क साधा. मौखिक कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपानाची वाईट सवय सोडणे आवश्यक आहे. मौखिक स्वच्छतेची काळजी घेणे, तोंड आणि जीभ नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. तोंडाच्या आत काही बदल दिसल्यास किंवा अन्न गिळताना त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

धूम्रपान, तंबाखू आणि इतर अमली पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामध्ये असलेली केमिकल रसायने शरीराचे कार्य पूर्णपणे बिघडून टाकतात. ज्यामुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे तंबाखू किंवा गुटखा इत्यादी हानिकारक पदार्थांचे सेवन करणे टाळावे. याशिवाय तोंडाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आरोग्याची तपासणी करावी.

डॉ. विजय सुतार (वैद्यकिय प्रशासक, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा) सांगतात की, तोंडात पांढरे-लालसर पुरळ किंवा फोड,तोंड उघडण्यात अडचण,जीभ बाहेर काढतांना त्रास, आवाजात झालेला बदल यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या. तोंडाची स्वच्छता आणि दातांची काळजी नियमितपणे घेतली नाही तर हिरड्यांना सूज, जळजळ आणि इतर संसर्ग होऊ शकतात. या दीर्घकालीन संसर्गामुळे त्वचेच्या पेशींच्या डीएनएला नुकसान होऊन कर्करोग होऊ शकतो. मौखिक स्वच्छतेसाठी दिवसातून दोन वेळा दात घासणं, फ्लॉसिंग करणं, टूथब्रश वेळोवेळी बदलणं गरजेचं आहे.

उन्हाळ्यात वारंवार उष्णतेमुळे तोंड येत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून तात्काळ मिळवा आराम, उष्णता होईल कमी

चांगल्या मौखिक आरोग्यासाठी सुदृढ जीवनशैलीचा अवलंब करणे अतिशय गरजेचे आहे. त्याचबरोबर नियमित व्‍यायाम करणे तसेच ॲन्‍टीऑक्‍सिडंट, प्रोटीन, फायबरर्सचा समावेश असलेला पुरक आहार घेणे गरजेचे आहे. तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे वेळीच ओळखल्यास व वेळीच निदान झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. यासाठी तुमच्या तोंडात होणाऱ्या बदलनाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. ठराविक कालावधीनंतर तोंडाची व दातांची तपासणी करत राहायला हवी असेही डॉ सुतार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Rising cases of oral cancer detect the risk early with regular mouth checkups

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • Cancer Awareness
  • cancer risks
  • Doctor advice

संबंधित बातम्या

मधुमेह झाल्यानंतर केवळ 3–5 वर्षांत तरुणांमध्ये वाढतोय डायबीटिक रेटिनोपथीचा धोका, नेत्रतज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा
1

मधुमेह झाल्यानंतर केवळ 3–5 वर्षांत तरुणांमध्ये वाढतोय डायबीटिक रेटिनोपथीचा धोका, नेत्रतज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे कार्डिओव्‍हॅस्‍कुलर डिसीज होण्‍याचा धोका, जाणून घ्या सविस्तर
2

भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे कार्डिओव्‍हॅस्‍कुलर डिसीज होण्‍याचा धोका, जाणून घ्या सविस्तर

पुरुषहो सावधान! लघवीची धार झालीये कमी, असू शकते Cancer ची सुरूवात, वेळीच घ्या जाणून संकेत
3

पुरुषहो सावधान! लघवीची धार झालीये कमी, असू शकते Cancer ची सुरूवात, वेळीच घ्या जाणून संकेत

CML उपचारांच्या उद्दिष्टांमध्ये बदल, क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमियाचे पालटले स्वरूप; कसे जाणून घ्या
4

CML उपचारांच्या उद्दिष्टांमध्ये बदल, क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमियाचे पालटले स्वरूप; कसे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.