उन्हाळ्यात वारंवार उष्णतेमुळे तोंड येत? मग 'हे' घरगुती उपाय करून तात्काळ मिळवा आराम
बदलत्या ऋतूचा परिणाम शरीरावर सुद्धा लगेच दिसून येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घेणे अवश्यक आहे. कारण उन्हाळयात डिहायड्रेशन किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्येसोबतच इतरही आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळा वाढल्यानंतर शरीराला पचन होईल असे हलके अन्नपदार्थ आणि भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीरात थंडावा राहतो. डिहायड्रेशनची समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेकांना वारंवार तोंड येऊ लागते. तोंडात होणाऱ्या जखमांमुळे काहीवेळा असह्य वेदना होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात उष्णता निर्माण झाल्यानंतर किंवा पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे तोंड येणे, डिहायड्रेशनची समस्या उद्भवू लागते. तोंड आल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र गोळ्या औषदनांच्या सेवनामुळे ही समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तोंड आल्यानंतर कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यास आयुर्वेदीतील उपचार करून पाहावे. यामुळे शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. मध आणि वेलचीचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि जिभेवर झालेली जखम लवकर बरी होते. यामध्ये थंडावा आणि बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारे अनेक गुणधर्म आढळून येतात. यासाठी एक चमचा मधात वेलची पावडर मिक्स करून तोंड आलेल्या ठिकाणी लावावी. ५ किंवा १० मिनिटं मधाचे मिश्रण तसेच ठेवावे. हा उपाय केल्यास २ किंवा ३ दिवसांमध्ये लगेच आराम मिळेल.
खोबऱ्याचे तेल आरोग्यासंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करते. खोबऱ्याच्या तेलात असलेले औषधी गुणधर्म सर्व समस्यांपासून आराम मिळवून देतात. वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल घेऊन तोंड आलेल्या ठिकाणी आणि आजूबाजूला लावून घ्या. यामुळे तोंडात होणारी जळजळ कमी होईल आणि आराम मिळेल. खोबऱ्याच्या तेलात दाहक-विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म आढळून येतात.
धार्मिक गोष्टींसाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तुळशीच्या पानांमध्ये असलेले घटक आरोग्य, त्वचा आणि इतर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी मदत करतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे तोंडात आलेला अल्सर बरा होतो. यासाठी तुळशीची पाने हातांवर कुस्करून तोंड आलेल्या ठिकाणी लावा. त्यानंतर त्यावर थोडे पाणी प्यावे. हा उपाय केल्यास तोंडात आलेला अल्सर लगेच बरा होईल.