उन्हाळ्याच्या दिवसांमधे हातापायांना घाम का येतो?
उन्हाळा वाढल्यानंतर संपूर्ण शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र नेहमी नेहमी शरीरात होणाऱ्या या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उन्हाळा ऋतू सुरु झाल्यानंतर पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशन, सतत मळमळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. या दिवसांमध्ये शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे उन्हाळयात बाहेर जाताना आरोग्य आणि त्वचेची जास्त काळजी घ्यावी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामाच्या धारांमुळे सर्वच जण त्रस्त होतात. मात्र अनेकांच्या हातापायांना सतत घाम सुटतो.(फोटो सौजन्य – iStock)
रात्रीच्या वेळी दात कशामुळे दुखतात? दातांचे दुखणे वाढल्यास ‘हे’ घरगुती उपाय करून तात्काळ मिळेल आराम
उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये अनेकांच्या हातापायांना घाम येतो. हातापायांना घाम आल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. या समस्येला हायपरहाइड्रोसिस असे म्हंटले जाते. घामाच्या ग्रंथी सामान्यपेक्षा जास्त सक्रिय झाल्यामुळे शरीरातून सतत घामाच्या धारा वाहू लागतात. या घामाच्या धारामुळे काही वेळा कंटाळल्यासारखे वाटू लागते. हातापायांना घाम आल्यानंतर अनेकदा लॅपटॉप किंवा मोबाईल वापरताना घामामुळे अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हातापायांना घाम येण्याची नेमकी काय कारण आहेत? यावर कोणते घरगुती उपाय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
शरीरात घामाच्या ग्रंथी जास्त प्रमाणात सक्रिय झाल्यानंतर शरीरात अधिक प्रमाणात घाम येऊ लागतो. त्यामुळे हातापायांना सतत घाम येऊ लागतो. वारंवार हातापायांना घाम असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
शरीरात मानसिक किंवा शारीरिक तणाव वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. चिंता वाढल्यानंतर हातापायांना लगेच घाम येतो. याशिवाय वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा शरीराच्या तापमानात बदल होतो, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.
शरीरात थायरॉइडसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेकदा शरीरात बदल होतात. थायरॉइडच्या ग्रंथी अनियमित झाल्यामुळे हातापायांना सतत घाम येऊ लागतो. त्यामुळे थायरॉइड असलेल्या लोकांनी ही समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.
उन्हाळ्यात वारंवार उष्णतेमुळे तोंड येत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून तात्काळ मिळवा आराम, उष्णता होईल कमी
वारंवार तुमच्या हातापायांना घाम येत असल्यास दैनंदिन आहारात थंड पदार्थांचे भरपूर सेवन करावे. याशिवाय थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. याशिवाय हातांवर अँटीपर्स्पिरंट लावल्याने शरीरातील घामाच्या ग्रंथी नियमित राहतात, ज्यामुळे वारंवार घाम येत नाही. घरगुती पदार्थांमधील बेकिंग सोड्याचा वापर करून सुद्धा तुम्ही हातानं येणारा घाम नियमित करू शकता. बेकिंग सोड्यामध्ये अँटीपर्स्पिरंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात.