
नाजूक भागाला होऊ शकतो साबण आणि परफ्यूममुळे धोका (फोटो सौजन्य - iStock)
सुगंधित उत्पादने आणि युरोलॉजिकल ऍलर्जी यांच्यातील परस्परसंबंध काय?
परफ्यूम, डिओड्रंट्स, इंटिमेट वॉश, बॉडी लोशन आणि अगदी कपडे धुण्याचे डिटर्जंट पावडरमध्येही रसायन, रंग आणि कृत्रिम सुगंध असतात जे जननेंद्रियाच्या नाजूक त्वचेवर परिणाम करतात. आपल्या हातांच्या किंवा पाठीच्या त्वचेच्या तुलनेने जननेंद्रियाचा भाग अत्यंत संवेदनशील असतो आणि त्यामुळे जळजळ होण्याची शक्यता अधिक असते.
जेव्हा सुगंधित उत्पादनं किंवा तीव्र रसायने या संवेदनशील त्वचेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यामुळे या नाजूक त्वचेस खाज सुटणे, जळजळ होणे आणि त्वचा कोरडी पडणे यासारखी लक्षणं आढळतात. या लक्षणांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात कारण त्यांना वाटते की हे मूत्रमार्गाच्या संसर्गाचे (UTI) लक्षण आहे.
Women Hygiene: 5 कारणांमुळे शारीरिक संबंधांनंतर सुजते योनी, कशी घ्याल काळजी
त्वचेची जळजळ का होते
अनेक प्रकरणांमध्ये, मात्र हा संसर्ग नसून सुगंधित उत्पादनांमुळे होणारी त्वचेची होणारी जळजळ आहे. महिलांना अनेकदा योनामार्गात लालसरपणा, कोरडेपणा, जळजळ होणे अशा तक्रारी सतावतात तर पुरुषांना सुगंधित उत्पादनांचा अनियंत्रित वापर केल्यामुळे जननेंद्रियाच्या भागात खाज सुटणे, पुरळ येणे किंवा लघवी करताना जळजळ होणे अशा तक्रारी उद्भवतात.
शिवाय, एकाच वेळी अनेक सुगंधी उत्पादनांचा वापर केल्यास, साबण, आफ्टर-शॉवर बॉडी स्प्रे, सुगंधी वाइप्स आणि डिओडोरंट्स वापरल्याने त्यातील रसायनांमुळे त्वचेसंबंधी ऍलर्जी उद्भवते. घट्ट अंतर्वस्त्र वापरणे, प्रायव्हेट भागात जास्त घाम येणे, शेव्हिंग करणे आणि जननेंद्रियाची अस्वच्छता तसेच सुती कपड्यांचा वापर न केल्यास या नाजूक भागात ॲलर्जीची समस्या उद्भवते.
त्वचेची ॲलर्जी टाळण्यासाठी या टिप्सचे पालन करा
सुगंध विरहीत, हायपोअॅलर्जेनिक साबण वापरणे आणि जननेंद्रियाच्या भागात डिओडोरंट्स किंवा सुगंधी उत्पादनांचा वापर टाळणे योग्य राहिल. तज्ञांच्या सल्ल्यानुसार सौम्य उत्पादनं, क्लींजर्स निवडा आणि स्वच्छेबाबत सावधगिरी बाळगा. तुमच्या नाजूक त्वचेला जास्त स्क्रबिंग किंवा वारंवार साबणाने धुणे टाळा कारण असे केल्याने त्वचा कोरडी होऊन त्वचेची जळजळ होऊ शकते.
कपडे धुण्याच्या बाबतीत, सौम्य आणि कोणतेही सुगंध किंवा कठोर रसायने नसलेले डिटर्जंट वापरण्याचा प्रयत्न करा. जर जळजळ कायम राहिली तर तज्ञ जळजळ कमी करण्यासाठी तज्ज्ञांकडून सौम्य क्रीम्स, अँटीहिस्टामाइन्स किंवा काही ठराविक औषधांचा वापर करण्याचा सल्ला दिला जाईल. या महत्त्वाच्या टिप्सचे पालन करून जननेंद्रियाची योग्य स्वच्छता राखा तसेच लैंगिक आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
Vaginal Gas: योनीमध्ये गॅससाठी जबाबदार ठरतात 5 कारणं, प्रतिबंध करण्याची पद्धत